पार्थ पवारांच्या ‘काका मला वाचवा’ हाकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी ओ दिला, अंबादास दानवे यांची टीका
अजित दादांचा राजीनामा घेणे तर दूरच. आता त्यांचे सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही, याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिलेली आहे, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केले आहे. तसेच पार्थ पवारांनी ‘काका मला वाचवा’ हाकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी हो दिली, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे म्हणाले की, तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणून सांगतात, आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणता की ‘तपासावे’ लागेल!
अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची कागदे थेट बाजारात आणली गेली. आता पार्थ पावरांशी निगडित निर्णय घ्यायची वेळ आली की यांचा ‘अभ्यास’ सुरू झाला.. ‘काका मला वाचवा’, या हाकेला ओ दिला आहे बावनकुळे यांनी!
अजित दादांचा राजीनामा घेणे तर दूरच. आता त्यांचे सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही, याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिलेली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही असेही अंबादास दानवे म्हणाले.
तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणून सांगतात, आणि महसूलमंत्री @cbawankule तूम्ही म्हणता की ‘तपासावे’ लागेल!
अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची कागदे थेट बाजारात आणली गेली. आता पार्थ पावरांशी निगडित निर्णय घ्यायची वेळ आली की यांचा ‘अभ्यास’ सुरू…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 13, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List