पॅनिक अटॅक आणि थरकाप; शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाची झालेली वाईट अवस्था

पॅनिक अटॅक आणि थरकाप; शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाची झालेली वाईट अवस्था

हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच दोघांमध्ये घटस्फोट झाला. शोएबसोबत घटस्फोट झाल्यानंतर आपल्याला पॅनिक अटॅक येत होते आणि आयुष्यातील या कठीण काळामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, कोरिओग्राफर फराह खान हिने आपल्याला कसा आधार दिला याबाबत सानियाने खुलासा केला आहे. युट्यूब टॉक शोमध्ये ती बोलत होती.

सानियाने ‘सर्व्हिंग इट अप विथ सानिया’ (Serving It Up With Sania) हा नवीन यूट्यूब टॉक शो सुरू केला असून पहिल्याच एपिसोडमध्ये तिने आयुष्यातील सर्वात भावनिक क्षणांवर भाष्य केले. पहिल्या एपिसोडसाठी फराह खान ही प्रमुख पाहुणी म्हणून आली होती. दोघींमध्ये दिलखुलास संवाद झाला. यावेळी तिने शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर फराह खान आपल्याला यातून सावरण्यास कशी मदत केली हे सांगितले.

“मला कॅमेऱ्यावर याचा उल्लेख करायचा नाही, पण एक क्षण असा होता जो माझ्या सर्वात वाईट क्षणांपैकी एक होता. जेव्हा तुम्ही (फराह खान) माझ्या सेटवर आलात आणि त्यानंतर मला एका लाइव्ह शोसाठी जायचे होते. तुम्ही तिथे आला नसता तर मी थरथरत होते आणि मी तो शो केला नसता. तुम्ही मला म्हणालात, काहीही झाले तरी तू हा शो करत आहेस”, असे सानियाने सांगितले

त्या दिवसाची आठवण करत फराह म्हणाली की, “सानियाला इतकी अस्वस्थ पाहून ती खूप घाबरली होती. मी खूप घाबरले होते. मला त्या दिवशी शूटिंग करायची होती, पण मी सगळं सोडून पायजमा आणि चप्पल घालून तिथे पोहोचले. तिला फक्त त्या क्षणी तिच्या मैत्रिणीसोबत राहायचे होते. कारण मला तिला पॅनिक अटॅक येताना पहायचे नव्हते.”

दरम्यान, सानियाने एप्रिल २०१० मध्ये शोएब मलिकशी लग्न केले आणि २०१८ मध्ये त्यांचा मुलगा, इझहान मिर्झा मलिक याचा जन्म झाला. जानेवारी २०२४ मध्ये शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्याची घोषणा केली. त्यानंतर सानियाच्या कुटुंबाने या जोडप्याच्या वेगळे होण्याची (तलाक) पुष्टी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वेलचीचे नव्हे तर त्याच्या पानांचे देखील असंख्य फायदे आहेत…. जाणून घ्या वेलचीचे नव्हे तर त्याच्या पानांचे देखील असंख्य फायदे आहेत…. जाणून घ्या
भारतीय जेवणामध्ये भरपूर प्रमाणात मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. वेलची ही एक अशी गोष्ट...
न्यूमोनियामुळे फुप्फुसांचाच नाही तर सांधेदुखीचा त्रास सुद्धा होतो का?
सरकारने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं, रोहित पवार यांनी सुनावले
आपल्या किचनमध्ये दडलेत पित्तावरील रामबाण उपाय, जाणून घ्या
Delhi Bombblast बाबरीचा घ्यायचा होता बदला, सहा डिंसेंबर सहा ठिकाणं… असा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
Photo – आता मालिकांमध्येही प्री वेडिंग शूट, पाहा सखी-कान्हाचं फोटोशूट
पॅनिक अटॅक आणि थरकाप; शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाची झालेली वाईट अवस्था