ऊसदर आंदोलन चिघळले; तीन वाहने पेटविली, शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील घटना

ऊसदर आंदोलन चिघळले; तीन वाहने पेटविली, शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील घटना

ऊसदराच्या तोडग्यासाठी आंदोलन सुरू असतानाच कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील मार्गावर ऊस वाहतूक करणारे तीन ट्रक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

शिरोळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ऊसदरासाठी विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. उसाचा भाव निश्चित करून हा भाव मिळवण्यासाठी शेतकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तालुक्यात विविध मार्गांनी आणि विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. 1 नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार असला, तरी कर्नाटकात सुरू झालेल्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमाभागातील साखर कारखान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापूर जिह्यात कारखान्यांकडून 1 नोव्हेंबरपूर्वीच हंगाम सुरू करण्यात येत आहे. उसाची पळवापळवी टाळण्यासाठी कारखान्यांनी मुदतीपूर्वीच कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संघटनांनी केलेल्या दराच्या मागणीवर कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे. कारखानदारांकडून केवळ एफआरपीची रक्कम जाहीर केली जात असल्याने शिवाय गेल्या हंगामातील जादाची बिले देण्याबाबत कारखानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे.

कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील मार्गावर मंगळवारी (दि. 28) ऊस वाहतूक करणारे तीन ट्रक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिले. यामुळे आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखणे, कारखान्यासमोर आंदोलन करणे, वाहने पेटवून देणे अशा स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्यापूर्वी ऊसदराचा प्रश्न मार्गी लावून हंगाम सुरळीत सुरू व्हावा, अशी मागणी शेतकऱयांमधून होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारायणा हेल्थचं आणखी एक दमदार पाऊल… यूकेतील प्रॅक्टिस प्लस ग्रुप हॉस्पिटलचं अधिग्रहण नारायणा हेल्थचं आणखी एक दमदार पाऊल… यूकेतील प्रॅक्टिस प्लस ग्रुप हॉस्पिटलचं अधिग्रहण
देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना सुलभ आणि माफक दरात आरोग्य सेवा देणाऱ्या नारायणा हेल्थने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. जागतिक दर्जाच्या या...
एकतेचा नारा देत मोदी सरकार देशाचे विभाजन करत आहे; मल्लिकार्जुन खरगे
क्रीडा विश्वावर शोककळा, ऑलिम्पिक पदक विजेते गोलकीपर मॅन्युएल फ्रेडरिक यांचे निधन
शेतकर्‍यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा! उद्धव ठाकरे यांची मागणी
Mohammad Azharuddin – क्रिकेटनंतर राजकीय मैदानात नवी इनिंग, टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन झाला कॅबिनेट मंत्री
राजस्थानमध्ये एटीएस आणि आयबीची मोठी कारवाई, तीन संशयित दहशतवाद्यांना अटक
सोने, चांदी आणखी स्वस्त होणार? अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचे जाणून घ्या संकेत…