शहांना अ‍ॅनाकोंडा म्हटल्याने मिंधेंची आदळआपट

शहांना अ‍ॅनाकोंडा म्हटल्याने मिंधेंची आदळआपट

शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ‘अ‍ॅनाकोंडा’ची उपमा दिली होती. उद्धव ठाकरे यांची ही टीका भारतीय जनता पक्षापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिक झोंबली आहे. ‘शहा अ‍ॅनाकोंडा नाहीत’ म्हणत शिंदेंनी आज या टीकेला तत्परतेने उत्तर दिले. यावरून ‘टीका शहांवर आणि आदळआपट मिंधेंची’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटल्या आहेत.

‘मुंबई विकणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही जुनी कॅसेट आहे. शहा मुंबईकरांना देण्यासाठी आले होते, मुंबईकडून काही घेण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे त्यांना अ‍ॅनाकोंडा म्हणणे चुकीचे आहे,’ असे सांगत शिंदे यांनी शहांचा स्तुतीपाठ गायला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे…

‘अ‍ॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप. तो आज मुंबईत येऊन गेला. भाजप कार्यालयाचं भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे. पण तो मुंबई कशी गिळतो ते मी बघतोच! नाही त्याचं पोट फाडून आलो तर नावाचा नाही,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर तोफ डागली होती. संयुक्त महाराष्ट्र लढय़ात मराठी माणसांना गोळय़ा घालण्याचा आदेश देणारे मोरारजी देसाई हे गुजरातीच होते. गोळय़ा घालून मराठी माणूस झुकत नाही हे लक्षात आल्यावर आता पैसे देऊन मुंबई ताब्यात घेण्याचा दिल्लीत बसलेल्या दोन व्यापाऱयांचा प्रयत्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र