गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार

गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार

कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात फरार झालेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा युरोपात वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला देशात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. बनावट पारपत्रांच्या आधारे तो परदेशात गेल्याचे तपासात उघड झाले आहे.

घायवळविरुद्ध पूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बजावली असून इंटरपोललाही याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नीलेश घायवळसह भाऊ सचिन घायवळ याच्याविरुद्ध नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. मात्र सचिन घायवळ सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

नीलेश घायवळने ‘घायवळ’ऐवजी ‘गयावळ’ नावाने बनावट कागदपत्रे तयार करून अहिल्यानगर येथून ‘तत्काळ’ प्रक्रियेतून पारपत्र मिळवले असल्याचे तपासात समोर आले आहे. या पारपत्राच्या आधारे तो 90 दिवसांच्या व्हिसावर परदेशात गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घायवळविरुद्ध आतापर्यंत खून, खंडणी, संघटित गुन्हेगारी यांसह आठ गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या प्रत्यार्पणानंतर या प्रकरणांच्या तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘या’ दाण्याचे पाणी, चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यासह शरीरातील समस्याही होतील झटक्यात दूर सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘या’ दाण्याचे पाणी, चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यासह शरीरातील समस्याही होतील झटक्यात दूर
मेथी दाण्याला आयुर्वेदात एक चमत्कारिक औषधी वनस्पती मानले जाते. त्याच्या लहान बियांमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म मोठ्या...
अंडी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावीत की नाही? 90 टक्के लोकांना कदाचित योग्य उत्तर माहित नसेल
आणि मुख्यमंत्री व गद्दार उपमुख्यमंत्री बेस्टमध्ये 150 नवीन बसेस दाखल झाल्याचा उत्सव साजरा करतात, आदित्य ठाकरे यांची टीका
नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या होती, बिहारच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात
Latur News – लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळापैकी 29 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी
Photo – राष्ट्रपती मुर्मू यांची राफेल भरारी
हेलिकॉप्टर दादाची रिल झाली व्हायरल, कर्नाटकातील हरवलेल्या मनोरुग्ण तरुणाचा लागला शोध