अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 11 हजार कोटींचा निधी मंजूर, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 11 हजार कोटींचा निधी मंजूर, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केले आहेत. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. ही मदत आठवडय़ात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील  आठ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असून सुमारे 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हे पैसे अंदाजपत्रकात नसल्यामुळे विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले. पुढील 15 दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सध्या विविध जिह्यांमध्ये निधी वेगवेगळय़ा कारणांसाठी वितरित करण्यात आला आहे. काही ठिकाणी अंशतः रक्कम जमा झाली आहे. याचे कारण म्हणजे आम्ही ठरवले होते की, ज्या-ज्या जिह्यांचे प्रस्ताव येतील तशी त्यांना मदत देण्यात आली. त्यामुळे एनडीआरएफची मदत मिळाली अशी शंका घेण्याची गरज नाही. प्रथम दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत जमा झाली होती. त्यानंतर एक हेक्टरसाठी 648 कोटींची मदत करण्यात आली आहे.

15 दिवसांत पैसे जमा

मंत्रिमंडळ बैठकीत जमा झालेल्या मदतीची रक्कम येत्या 15 दिवसांत मिळेल असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘योग्य पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, अपात्र शेतकऱ्यांना तीन मिळू नये यासाठी सरकार काळजीपूर्वक काम करत आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात पुनर्पडताळणी केली जात आहे. पुढील 15 ते 20 दिवसांत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. या कालावधीत 90 टक्के शेतकऱ्यांना मदत पोहोचेल. निधीची कोणतीही कमतरता नाही. 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजपैकी सुमारे 21 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. यापैकी 8 हजार कोटी रुपये आधीच वितरित झाले असून आणखी 11 हजार कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे दिले जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र