पक्ष कार्यालयातील नाचगाण्याने पक्षाची प्रतिमा मलिन, जिल्हाध्यक्षांकडून अजितदादा गटाने मागवला खुलासा
दीपावली मिलननिमित्ताने अजित पवार गटाच्या नागपूर येथील पक्ष कार्यालयात लावणीचा कार्यक्रम रंगल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याची गंभीर दखल अजितदादा गटाने घेतली आहे. नाचगाण्याच्या या कार्यक्रमामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. याबाबत खुलासा करण्याचे आदेश नागपूर जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत.
अजित पवार गटाच्या नागपूर येथील गणेश पेठ कार्यालयात ‘दीपावली मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान पक्षाचे काही पदाधिकारी यांनी नृत्य व नाचगाण्याचा कार्यक्रम पक्ष कार्यालयात घेतला. त्याची प्रसार व समाजमाध्यमांत प्रसिद्धी होऊन पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार लेखी खुलासा सादर करण्यात यावा, असे आदेश जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर यांना एका पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List