सोन्याचा भाव उतरला, चांदीच्या दरात घसरण
सवा लाखाच्या पुढे गेलेले सोने मागील आठवड्यापासून कमी होताना दिसत आहे. सराफा बाजारात सोन्याचा भाव मंगळवारी 1913 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर चांदीच्या दरातसुद्धा घसरण झाली असून चांदी 1631 रुपये स्वस्त झाली आहे. मागील आठ दिवसांत सोने तब्बल 10 हजार 420 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी 25 हजार 830 रुपयांनी घसरली आहे. मंगळवारी सोने प्रति तोळा 1 लाख 21 हजार रुपयांपर्यंत खाली आले, तर चांदी प्रति किलो 1 लाख 77 हजारांवरून 1 लाख 43 हजार 400 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
सोन्याच्या किमतीत 3 टक्के जीएसटी, मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्सच्या मार्जिनचा समावेश करण्यात आला नाही. दिवाळी सणांनंतर सोने आणि चांदीची खरेदी मंदावली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीची मागणी कमी झाली. त्यामुळे किमतीत घसरण होत आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 43,002 ने वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 पॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 76,162 होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List