दिवाळीनंतरही पालघरच्या बाराशे शिक्षकांना पगार नाही, चार महिन्यांपासून नऊ कोटी थकवले तरी सरकारला जाग येईना
दिवाळी झाली तरी पालघर जिल्ह्यातील 1200 कंत्राटी शिक्षकांना अद्याप पगार मिळालेला नाही. गेल्या चार महिन्यांपासून शिक्षण विभागाने 9 कोटी 53 लाख रुपये थकवले तरीदेखील सरकारला जाग आली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी ठरली. सरकारच्या या बेफिकिरीविरोधात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी संताप करत आहेत. व्यक्त केला आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या तब्बल बाराशे कंत्राटी भाषा शिक्षकांना जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत पगारापोटी तब्बल 9 कोटी 53 लाख रुपये इतका निधी राज्य शासनाकडून वारंवार मागणी करूनही मिळालेला नव्हता. यातील काही शिक्षक 16 हजार रुपये प्रति महिना तर सेवानिवृत्त प्रवर्गातील काही शिक्षक 20 हजार रुपये प्रति महिना काम शिक्षणाचे कर्तव्य पार पाडूनही जिल्ह्यातील शिक्षक मानधनाविना उपेक्षित आहेत.
शुक्रवारी ट्रेझरी सुरु होती
जिल्हा परिषदेकडे वेतनाची रक्कम वर्ग केल्यावर पगार हातात पडणार होता. मात्र दिवाळीची सुट्टी असल्यामुळे ट्रेझरीतून शिक्षकांच्या खात्यात पगार जाऊ शकला नाही. मात्र शुक्रवारी कार्याल य सुरू झाले होते तरीही ती रक्कम या शिक्षकांच्या खात्यात का जमा केली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List