नालासोपाऱ्यातील ड्रग्जप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित
नालासोपारा येथील पेल्हार भागात ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून 14 कोटी रुपयांचे मेफेड्रोन व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. या ड्रग्जप्रकरणी पोलीस आयुक्त निकेश कौशिक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसे आदेशच जारी केल्याने अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोनची (एमडी) निर्मिती करणारा कारखाना चालवला जात होता याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी परिमंडळ सहाच्या पथकाने नालासोपाऱ्यात कारखान्यावर छापा टाकून साडेतेरा कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करून याप्रकरणी पाच जणांना अटक केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List