पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
पुणे बाजार समितीतने वाहन प्रवेश शुल्क वसुलीसाठी 11 लोकांचा मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका दिला. मात्र, हे अकरा लोक केवळ कागदावर दाखवून शेतमाल आवक नोंद करणाऱ्या ठेकेदाराकडून त्या त्यांचे काम करून घेतले. त्यामुळे गेल्या संचालक मंडळाच्या 28 महिन्यात सुमारे काम न करता 70 लाख रुपये ठेकेदाराच्या घशात घातले आहेत. संचालक मंडळाला सरकार पाठीशी घालत असल्यामुळे या घोटाळ्या मागील सूत्रधाराचा शोध कोण घेणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
पुणे बाजार समितीकडून बाजारात वाहनांना प्रवेश देण्याच्या नावाखाली पाच तासांसाठी प्रति वाहन दहा रुपये शुल्क आकारले जाते. हे पैसे गोळा करण्यासाठी बाजार समितीने कोणतीही स्पर्धा न करता बिबवेवाडी येथील मे मोरया एंन्टरप्रायजेस यांना 11 लोकांचा मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका देऊन टाकला. यापूर्वी हा ठेका दुसऱ्या ठेकेदाराने होता. त्या अकरा लोकांकडून बाजार समितीच्या गुळ भुसार विभागाच्या गेट क्रमांक 1,2,4,5,9,10 मधुन शेतीमाल घेवून येणाऱ्या वाहनांकडून प्रवेश फी वसूल करण्याची जबाबदारी दिली. मात्र, प्रत्यक्षात अकरा लोक केवळ कगदरवच आहेत. बाजार समितीत स्पिंडल वर्ल्ड या ठेकेदारामार्फत फळे, भाजीपाला, कांदा बटाटा, भुसार बाजारात गेटवर संगणकावर शेतमालाची आवक नोंद केली जाते. स्पिंडल वर्ल्ड ठेकेदाराकडील कचऱ्यांकडूनच संगणकावर आवक घेणे आणि वाहन प्रवेश शुल्क वसूल अशी दोन्ही कामे केली जातात. त्यामुळे बिबवेवाडीतील मे मोरया एंन्टरप्रायजेस या ठेकेदाराला अकरा लोकांचा पगार काही न करता मिळत आहे.
वाहनचालंकडून मनमानी लूट
गेट एन्ट्री शुल्क पावती पाच तासांसाठी असते. पहिल्या पाच तासांसाठी दहा रुपये शुल्क आकारले जाते. त्यानंतर किती पैसे करायचे याचा कुठेही उल्लेख नाही. परराज्यातील वाहन चालकांना मराठी भाषा वाचता येत नाही. त्यामुळे मराठीतील 10 हिंदीत 90 सांगतात आणि पाच तासानंतर अगदी 100 ते 300 रुपये मनमानी पद्धतीने पैसे घेतात. तर महाराष्ट्रातील वाहन चालकांना मराठी भाषा लिहिता वाचता येत असली तरी पाच तासानंतर किती शुल्क हे नमूद केले नसल्याने त्यांच्याकडूनही मनमानी पद्धतीने वसुली केली जात आहे. यातून अशा पद्धतीने महिन्याला लाखो रुपयांचा घोटाळा होत आहे.
बिबवेवाडीतील ठेकेदारामागे संचालक कोण?
संचालक मंडळ आल्यापासून कोणाच्या ना कोणाच्या जवळील लोकांना मनमानी पद्धतीने ठेके दिले आहेत. कोणतीही स्पर्धा न करता बिबवेवाडी येथील मे मोरया एंन्टरप्रायजेस यांना ११ लोकांचा मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका दिला. बिबवेवाडीतील या ठेकेदाराला काम न करता बिले अदा होत आहेत. त्यामुळे बिबवेवाडीतील ठेकेदारामागे संचालक कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहन प्रवेश शुल्क वसूल करणे आणि आवक नोंद कामकाज ही दोन स्वतंत्र कामे आहेत. दोन्ही कामे नक्की कोण करत आहेत, याची पाहणी केली जाईल. याबाबत कर्मचारी हजेरी कामका अहवाल संबंधित विभाग प्रमुखांना ठेवण्यास सांगितला आहे.
– डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List