पश्चिम बंगालसह 12 राज्यांत आजपासूनच एसआयआर, निवडणूक आयोगाकडून देशव्यापी कार्यक्रमाची घोषणा

पश्चिम बंगालसह 12 राज्यांत आजपासूनच एसआयआर, निवडणूक आयोगाकडून देशव्यापी कार्यक्रमाची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशव्यापी मतदार यादी फेरछाननीची (एसआयआर) घोषणा केली. त्यानुसार, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशासह 12 राज्यांत 28 ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, अंदमान-निकोबार, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांसह 12 राज्यांत मतदार फेरछाननी होईल.

बिहारमध्ये झालेली मतदार यादी फेरछाननी हा देशव्यापी एसआयआरचा पहिला टप्पा होता. हा दुसरा टप्पा असेल. ही संपूर्ण प्रक्रिया 7 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे ज्ञानेशकुमार यांनी सांगितले.

अशी असेल प्रक्रिया…

  • 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर ः प्रशिक्षण
  • 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ः घरोघरी जाऊन मतदार गणना
  • 8 डिसेंबर ः प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध होणार
  • 9 डिसें. ते 8 जाने. ः सूचना व हरकती कालावधी
  • 9 डिसेंबर ते 31 जाने. ः सुनावणी व पडताळणी
  • 7 फेब्रुवारी ः अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

ही कागदपत्रे चालणार

  • नोकरीच्या ठिकाणी मिळालेले कोणत्याही स्वरूपातील ओळखपत्र/पेन्शन पेमेंट ऑर्डर
  • हिंदुस्थान सरकार, बँका, पोस्ट ऑफिस, एलआयसी किंवा सरकारी पंपनीचे आयकार्ड, प्रमाणपत्र किंवा कागदपत्र
  • जन्माचा दाखला
  • पासपोर्ट
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • निवासाचा कायमस्वरूपी पत्ता
  • वनहक्क प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • एनआरसी (अस्तित्वात असल्यास)
  • फॅमिली रजिस्टर
  • जमीन किंवा घर

वितरण प्रमाणपत्र

आधार (फक्त ओळखीचा पुरावा म्हणून)

महाराष्ट्राला वगळले!

महाराष्ट्रात मतदार यादीत अनेक घोळ असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मतदार यादीची फेरछाननी व्हावी अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र, देशव्यापी एसआयआरच्या दुसऱया टप्प्यातून महाराष्ट्राला वगळण्यात आले आहे. केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असूनही तिथे एसआयआर होणार आहे. याबाबत विचारले असता, तिथे अद्याप अधिसूचना काढण्यात आलेली नाही, असे उत्तर ज्ञानेश कुमार यांनी दिले.

  • कोणत्या राज्यांत होणार… मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामीळनाडू, गुजरात, केरळ, गोवा, छत्तीसगड, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, पुद्दुचेरी.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कॅच पकडताना क्रिकेटर श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंतर्गत...
हिवाळ्यात ‘हा’ एक पदार्थ खा आणि अनेक आजारांपासून आराम मिळवा… डॉक्टरकडे जावं लागणार नाही!
बिहार निवडणुकीपूर्वी RJD ने घेतला मोठा निर्णय, 27 गद्दारांची पक्षातून हकालपट्टी
Photo – पुण्याच्या ‘बीबी रेसिंग’ने पहिली फेरी गाजवली
अमित शहांना म्हटले लोहपुरुष, वल्लभभाई पटेलांसोबत केली तुलना; काँग्रेसने भाजपला फटकारले
LOC वर पाकिस्तानकडून फायरिंग, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर
खासगी बसचा हाय टेन्शन वायरला स्पर्श, भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू तर 12 जण जखमी