अतिवृष्टीची नुकसानभरपाई न मिळाल्याने नांदेडात शेतकऱ्यांनी सरकारी वाहन फोडले
मुदखेड तालुक्यातील वासरी येथील अतिवृष्टी झालेल्या पिकांचे शासकीय अनुदान न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या तहसीलदारांच्या वाहनाच्या काचा फोडून घोषणा दिल्या.
आज सोमवारी दुपारी मुदखेड तालुक्यातील शेतकरी साईनाथ संभाजी खानसोळे यांनी अतिवृष्टीत झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान न मिळाल्यामुळे ‘जय जवान जय किसान’ असा नारा देत तहसीलदारांच्या शासकीय गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या.
तहसीलदार आनंद देऊळगावकर हे तहसील कार्यालयात हजर असताना शेतकऱ्याने थेट वाहनावर दगड घालून काचा फोडल्या. या घटनेची माहिती समजताच तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी, कामकाजासाठी आलेले नागरिक यांनी घटनास्थळी एकच धाव घेतली. सदर घटनेचा व्हिडिओ करून शेतकऱ्याने तहसीलदार यांच्या वाहनांना लक्ष्य करत ‘जय जवान जय किसान’ असे नारे देत गाडी फोडली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List