डेन्मार्क ओपनमध्ये सात्किक–चिराग जोडीकडून पहिल्या विजेतेपदाची अपेक्षा
हिंदुस्थानची स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी डेन्मार्क ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत देशाच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहे. उद्यापासून (दि.14) सुरू होणाऱया 9,50,000 अमेरिकन डॉलर्स बक्षिसाच्या या स्पर्धेत ही सहावी मानांकित हिंदुस्थानी जोडी आपल्या उत्कृष्ट फॉर्मला विजेतेपदात रूपांतरित करण्याच्या प्रयत्नात असेल. त्यांचा पहिला सामना स्कॉटलंडच्या ख्रिस्तोफर ग्रिमली आणि मॅथ्यू ग्रिमली या जोडीकिरुद्ध होणार आहे. सात्किक-चिराग जोडीने यंदाच्या सत्रात देशासाठी सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी केली असली, तरी त्यांना अद्याप एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळालेले नाही. त्यांनी या हंगामात हाँगकाँग आणि चीन मास्टर्स सुपर 750 स्पर्धांच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. तसेच पॅरिस जागतिक स्पर्धेत या जोडीने दुसरे कांस्यपदक जिंकले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List