बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी तर, दहावीची 20 फेब्रुवारीपासून
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी ही माहिती दिली. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी, दहावीची लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा घेण्यात येतात. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
- परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List