ट्रेंड- पालखी निघाली राजाची…
काही मंडळींना वाद्ये वाजवण्याची भरपूर आवड असते. घराचा दरवाजा, बादली, भांडी, टोप घेऊन अनेक जण त्यांची वाद्य वाजवण्याची आवड पूर्ण करतात. सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही खरंच थक्क होऊन जाल. वाद्य वाजवण्याची आवड असणाऱया एका चिमुकल्याने प्लास्टिकचे डबे, वही, कंपास, पाण्याची बाटली यांचा एक सेटअप तयार केला आहे. सेटअप तयार केल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये ‘पालखी निघाली राजाची’ गाणे वाजायला सुरुवात होते. त्यानंतर पेनाच्या साह्याने चिमुकला ज्या प्रकारे वाजवायला सुरुवात करतो, ते पाहून आणि ताल, सूर ऐकून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल. हा व्हिडीओ @krk241013 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List