श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी

श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कॅच पकडताना क्रिकेटर श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. ड्रेसिंग रुममध्ये जाताच श्रेयस बेशुद्ध पडला आणि त्याची स्थिती चिंताजनक होती. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आणि स्कॅनमध्ये त्याच्या ‘प्लीहा’ला जखम झाल्याचं समोर आलं.

प्लीहा म्हणजे काय आणि शरीरात त्याचं काम काय?

प्लीहा हा एक मूठीच्या आकाराचा मऊ अवयव आहे, जो बरगड्यांच्या डाव्या बाजूला खाली असतो. प्लीहाची दोन प्रमुख कार्ये आहेत. पहिलं म्हणजे ते संसर्गाशी लढण्यास मदत करतं आणि दुसरं, ते जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी काढून रक्त स्वच्छ करं. रक्तवाहिन्यांनी वेढलेलं हे शरीरातील सर्वांत नाजूक अवयवांपैकी एक आहे. प्लीहा रक्त फिल्टर करण्याचं काम करतं. ते रक्तातून बॅक्टेरिया, विषाणू आणि खराब झालेल्या रक्तवाहिन्या काढून टाकतं. जेव्हा रक्त प्लीहामधून शुद्ध होऊन शरीरात वाहू लागतं, तेव्हा पांढऱ्या रक्तपेशी कोणत्याही संसर्गाशी लढण्यास समर्थ होतात. लाल रक्तपेशींचं आयुष्य अंदाजे 120 दिवस असतं, त्यानंतर प्लीहा त्यांना नष्ट करते.

डाव्या बाजूला जोरात पडल्याने किंवा बरगडीला गंभीर दुखापत झाल्याने प्लीहाला इजा पोहोचू शकते आणि शरीरात रक्तस्राव होऊ शकतं. डॉक्टर यालाच splenic laceration असं म्हणतात.

प्लीहाची दुखापत किती गंभीर असते?

मेडिकल प्रोफेशनशी संबंधित UpToDate या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका मेडिकल पेपरमध्ये म्हटलंय की, प्लीहाच्या दुखापती या सामान्य ते जीवघेण्याही असू शकतात. जखम किती खोल आहे, त्यातून रक्तस्राव किती झाला, यावरून दुखापतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर सिटी स्कॅनचा वापर करतात.

किरकोळ दुखापत असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. परंतु गंभीर दुखापत किंवा अंतर्गत रक्तस्राव झाल्यास त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. रक्तस्राव सुरूच राहिला किंवा वाढला तर डॉक्टरांना एम्बोलायझेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे ते थांबवावं लागू शकतं. काही प्रसंगी प्लीहा काढून टाकण्यासाठीही शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.

उपचारानंतर पहिले 24 आणि 48 तास हे सर्वांत महत्त्वाचे असतात. सर्वकाही सुरळीत असेल तर डॉक्टर रुग्णाला हळूहळू हालचाल करण्यास, खाण्या-पिण्यास परवानगी देतात. प्लीहाची स्थिती जाणून घेण्यासाठी दररोज स्कॅन केले जातात. रक्तस्राव थांबल्यानंतर रुग्णाला जवळपास एक आठवडा निरीक्षणासाठी रुग्णालयात ठेवलं जातं. त्यानंतर त्याला डिस्चार्ज दिला जातो. परंतु काही महिने त्याला खूप हळू चालावं लागतं.

बरं होण्यासाठी किती वेळ लागतो?

प्लीहाची दुखापत बरी होण्यासाठी किमान सहा ते बारा आठवडे लागतात. म्हणजेच श्रेयस अय्यर जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहील. श्रेयसला त्वरित वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय.

श्रेयस भविष्यात क्रिकेट खेळू शकेल का?

प्लीहाची दुखापत असलेले बहुतेक लोक कोणत्याही दीर्घकालीन समस्यांशिवाय पूर्णपणे बरे होऊ शकतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यातही श्रेयस खेळाडू आणि तंदुरुस्त असल्याने त्याच्याबाबत डॉक्टर बरेच सकारात्मक आहेत. श्रेयसला डिस्चार्ज कधी मिळेल, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु डिस्चार्जनंतरही त्याला विश्रांती आणि देखरेखीची आवश्यकता असेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अंडी आणि काजूपेक्षा जास्त प्रोटीन देतं हे ‘स्वस्त ड्रायफ्रूट्स’; मेंदू ते हृदय राहिल निरोगी अंडी आणि काजूपेक्षा जास्त प्रोटीन देतं हे ‘स्वस्त ड्रायफ्रूट्स’; मेंदू ते हृदय राहिल निरोगी
शरीराला भरपूर प्रोटीन मिळण्यासाठी काजू-बदाम किंवा कोणताही सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे ड्रायफ्रूट्स हे तसे पाहायला गेले...
संध्याकाळची अशी 48 मिनिटे ज्यात काहीही अन्न खाऊ नये; प्रेमानंद महाराजांनी सांगितलं याचं सत्य
प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस; बिहार-बंगाल मतदार यादीत नाव, ३ दिवसांत मागितले उत्तर
Weather Update – पुढील तीन दिवस राज्यात कोसळधार! चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका बसणार
Bihar Election – प्रत्येक घरातील एका सदस्याला २० महिन्यांत सरकारी नोकरी, २०० युनिट वीज मोफत; महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध
शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही! मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी
पर्यटकांना घेऊन जाणारे विमान शाळेवर कोसळले, 12 जणांचा मृत्यू; अनेक जखमी