HSC and SSC Exam 2025 – 10 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान दहावी, बारावी परीक्षा; बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 यादरम्यान तर बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 यादरम्यान घेण्यात येणार आहे.
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात येईल. तर दहावीची तोंडी परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 कालावधीत होईल. परीक्षा कधी होणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. सोमवारी शिक्षण विभागाने वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List