सामना अग्रलेख – अफगाण-पाकमधील भडका!

सामना अग्रलेख – अफगाण-पाकमधील भडका!

दहशतवादाच्या दोन तलवारी एका म्यानेत राहूच शकत नाहीत. त्यामुळेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश आज एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. उभय देशांत उडालेल्या भडक्यानंतर ड्युरंड सीमा पेटली आहे व ताज्या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंनी मोठी प्राणहानी झाली आहे. अफगाण सरकारने आपल्या इशाऱ्यावर नाचावे, असे पाकिस्तानला वाटत होते; पण तसे झाले नाही. रशिया व अमेरिकेसारख्या महासत्तांना पुरून उरलेला अफगाण पाकिस्तानची काय डाळ शिजू देईल? या सर्व घडामोडींत ‘दुश्मन का दुश्मन दोस्त होता है’ या उक्तीप्रमाणे भारताचे संबंध अफगाणिस्तानसोबत मजबूत होत असतील तर ते चांगलेच आहे!

कधीकाळी एकमेकांचे ‘जिगरी दोस्त’ असलेले अफगाणिस्तान व पाकिस्तान हे आता एकमेकांचे ‘जानी दुश्मन’ बनले आहेत. गेल्या आठवडाभरात तर उभय देशांतील तणावाची परिस्थिती अधिकच चिघळली. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस उभय देशांत तुंबळ धुमश्चक्री उडाली. आधी पाकिस्तानने थेट सीमा ओलांडून अफगाणिस्तानच्या पंधार प्रांतात ड्रोनद्वारे हवाई हल्ले केले व क्षेपणास्त्रेही डागली. त्यापाठोपाठ अफगाणिस्तानच्या तालिबानी सैनिकांनीही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यांमध्ये 200 तालिबानी ठार केल्याचा दावा पाकिस्तानने केला असला तरी अफगाणिस्तान सरकारने मात्र आपले केवळ 20 सैनिक मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे. याउलट पाकिस्तानच्या हल्ल्याला आमच्या सैनिकांनी मूंहतोड जवाब दिला व आमच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 58 सैनिक ठार झाले, असे अफगाण सरकारचे प्रवत्ते जबिहुल्ला मुजाहीद यांनी म्हटले आहे. या हल्ल्यांनंतर पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या दरम्यान असलेल्या ड्युरंड लाइन या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याआधी 10 ऑक्टोबर रोजी तहेरिक-ए-तालिबानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे लेफ्टनंट कर्नल व एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यासह 10 सैनिक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी आम्ही हा हल्ला केला, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे, तर अफगाण सरकारनेही स्वसंरक्षणासाठीच पाकिस्तानवर हल्ला केल्याचे म्हटले आहे. युद्धाचा हा भडका असाच सुरू राहिला तर त्याचा भारताला फायदा होईल. त्यामुळे ही लढाई थांबवा, असा सूर आता पाकिस्तानातूनच उमटू लागला आहे. त्यामुळे दबावात आलेल्या पाकिस्तान सरकारची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. मुळात 2021 मध्ये अफगाणिस्तानात

तालिबानी राजवट

पुन्हा सत्तेवर आल्यापासून ड्युरंड लाइन कायम धगधगते आहे. या सीमेवरील अनेक भागांबाबत दोन्ही देशांदरम्यान हद्दीचा वाद आहे. शिवाय याच भागात टीटीपी अर्थात तहेरिक-ए-तालिबान (पाकिस्तान) या दहशतवादी संघटनेचा दबदबा आहे. अफगाणिस्तान सरकारच्या पाठिंब्यावर ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात सतत दहशतवादी हल्ले घडवते, असा आरोप पाकिस्तान कायम करत असतो. मुळात पाकिस्तानची पोटदुखी वेगळीच आहे. अफगाणिस्तानवर अमेरिकेचे वर्चस्व असताना पूर्वाश्रमीचे तालिबानी शासक मुजाहिदीन आणि सैनिक या सगळ्यांनाच पाकिस्तानने राजाश्रय दिला होता. इस्लामी अतिरेकी व दहशतवाद्यांना पोसणे हा पाकिस्तानी सैन्य व सरकारच्या परराष्ट्र धोरणाचाच भाग असल्याने अल कायदाच्या ओसामा बिन लादेनपासून इसिस, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहंमद व इतर अनेक दहशतवादी संघटना व त्यांच्या म्होरक्यांचे पालनपोषण पाकिस्तान कायमच करत आला व आजही पाकिस्तानचे हे धंदे सुरूच आहेत. आम्ही तुमचा एवढा सांभाळ केला तर आम्ही सांगू तसे तुम्ही ऐकले पाहिजे, अशी पाकिस्तानची सगळ्याच दहशतवादी संघटनांकडून अपेक्षा असते. मात्र तालिबान याबाबतीत वस्ताद निघाले. पाकिस्तानने उपकार केले म्हणून त्यांची गुलामगिरी करणे तालिबानला मान्य नाही. अफगाणिस्तान हे पाकिस्तानचेच पाचवे राज्य म्हणून राहावे, पाकिस्तानी सैन्य व सरकारच्या नियंत्रणाखाली पाकिस्तानी प्रांताप्रमाणे अफगाणिस्तानने आपले हुकूम मानावेत, असा पाकिस्तानचा डाव होता. अफगाणच्या माध्यमातून आखाती देशांपर्यंत हातपाय पसरून व्यापार व स्वतःचे महत्त्व वाढविण्याचा पाकचा इरादा होता. मात्र अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर तालिबानने

पाकचे हे मनसुबे

उधळून लावले आणि पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली नव्हे, तर एक स्वतंत्र व सार्वभौम देश म्हणून ओळख निर्माण करण्यावर तालिबानने भर दिला. शिवाय पाकिस्तानसोबतचे संबंध तणावपूर्ण असतानाच हिंदुस्थानसोबत मात्र मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यात तालिबानी शासकांनी रस दाखवला. शिवाय इराणमध्ये हिंदुस्थान विकसित करीत असलेल्या चाबहार बंदराचा मार्ग अफगाणमधूनच जात असल्याने हिंदुस्थानलाही अफगाणिस्तानशी मैत्रीचे संबंध हवे आहेतच. तालिबान सरकारची हिंदुस्थानसोबत वाढलेली सलगी आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी आठवडाभराच्या हिंदुस्थान दौऱ्यावर आल्यामुळे पाकिस्तानचा पोटशूळ अधिकच वाढला. पुन्हा जम्मू-कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे, असे वक्तव्य करून अफगाणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानच्या जखमेवर आणखीच मीठ चोळले. पाकिस्तानने अफगाणिस्तावर केलेल्या ताज्या हल्ल्यामागे ही सर्व पार्श्वभूमी आहे. दहशतवादाच्या दोन तलवारी एका म्यानेत राहूच शकत नाहीत. त्यामुळेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश आज एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. उभय देशांत उडालेल्या भडक्यानंतर डय़ुरंड सीमा पेटली आहे व ताज्या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंनी मोठी प्राणहानी झाली आहे. अफगाण सरकारने आपल्या इशाऱ्यावर नाचावे, असे पाकिस्तानला वाटत होते; पण तसे झाले नाही. रशिया व अमेरिकेसारख्या महासत्तांना पुरून उरलेला अफगाण पाकिस्तानची काय डाळ शिजू देईल? या सर्व घडामोडींत ‘दुश्मन का दुश्मन दोस्त होता है’ या उक्तीप्रमाणे भारताचे संबंध अफगाणिस्तानसोबत मजबूत होत असतील तर ते चांगलेच आहे!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. पायांच्याबाबतीत तुम्हालाही दिसली ही 3 लक्षणे तर समजून जा शरीरात काहीतरी बिघडलं आहे; ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बऱ्याचदा आपण आपल्या शरीराने दिलेल्या संकेतांकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. पण वारंवार तशा पद्धतीचे संकेत आपल्याला मिळत असतील तर समजून...
Photo – वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडियाचे ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन
अटी, शर्ती, निकष यांचं जाळं विणण्यात फडणवीस सरकार माहिर, शेतकऱ्यांच्या मदतीतील अटींवरून कैलास पाटील यांचा महायुतीवर निशाणा
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले
आज मी निश्चिंत झोपेन….चकमकीत मारल्या गेलेल्या आरोपी मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार
तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण स्मोकिंग सोडून द्या…, तुर्कीच्या राष्ट्रपतींचा सल्ला अन् मेलोनींच हटके प्रत्यु्त्तर चर्चेत
राहुल गांधी चंदीगडमध्ये; IPS अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट घेत केले सांत्वन