ब्रेड खाल्ल्याने खरंच कर्करोग होतो का? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?
आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे ना झोप पूर्ण होत आहे , ना शरीराला गरजेचे असणारे पोषक घटक मिळत आहे. खाण्याच्या वेळांपासून ते झोपण्याच्या वेळांपर्यंत सर्वच नियोजन बिघडलं आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयींचा देखील आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे कमी वयातच लोक मधुमेह आणि रक्तदाबासह अनेक आजारांना बळी पडत आहेत. पण आजकाल सोशल मीडियावरील असही म्हटलं जात आहे की ब्रेड खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की त्याचे सेवन खरोखरच कर्करोग होऊ शकते का? कारण जवळपास अनेकांच्या घरात ब्रेड खाल्ला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीत तज्ज्ञांकडून हे जाणून घेऊयात की खरंच ब्रेड खाल्ल्याने कर्करोग होतो का?
ब्रेडमुळे खरंच कर्करोग होऊ शकतो का?
कर्करोग सर्जन डॉ. जयेश कुमार म्हणतात की ब्रेडमधून कर्करोग होण्याची दोन प्रमुख कारणे असू शकतात. पहिले म्हणजे ते अॅक्रिलामाइड तयार करते. प्राण्यांना अॅक्रिलामाइड खूप जास्त प्रमाणात दिल्याने कर्करोग होतो हे दिसून आले आहे. तथापि, मानवांमध्ये त्याच्या घटनेचा अद्याप कोणताही पुरावा नाही. अशा परिस्थितीत, ते कमी प्रमाणात सेवन करणे किंवा संतुलित पद्धतीने आहारात समाविष्ट करणेच चांगले. कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारकच असते. डॉ. जयेश म्हणतात की ब्रेडमध्ये तयार होणाऱ्या अॅक्रिलामाइडचे प्रमाण दीर्घकाळात मानवांमध्ये कर्करोगाचे कारण बनते याचा कोणताही पुरावा अद्याप तरी सापडलेला नाही.
कोणते ब्रेड खाण्यास चांगले आहे?
आजकाल मार्केटमध्ये ब्रेडमध्येही अनेक प्रकार आलेले पाहायला मिळतात. डॉ. जयेश यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण गहू आणि मल्टीग्रेन ब्रेड पांढऱ्या ब्रेडपेक्षा थोड्याफार प्रमाणात चांगला ठरू शकतो. पण या ब्रेडचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.
गॅसवर थेट भाजलेली चपाती किंवा रोटी खाल्ल्याने कर्करोग होतो का?
आता, लोकांना अजून एक भीती सतावते आहे की गॅसवर चपाती, रोटी भाजल्याने कर्करोग होऊ शकतो. लोकांचा असा विश्वास आहे की गॅसवर चपाती, रोटी भाजल्याने रोटीमध्ये रसायने मिसळली जातात ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. पण याबद्दल डॉ. जयेश कुमार यांनी म्हटलं आहे की, गॅसवर चपाती, रोटी भाजल्याने कर्करोग होण्याची शक्यता पूर्णपणे कमी आहे कारण सर्व रसायने जाळल्यानंतर हवेत वाष्पीकरण होतात. हा पण ते जळलेली चपाती, रोटी खाणे टाळण्याचा सल्ला देतात. कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List