ISIS module busted in Delhi – दिल्लीत बॉम्बस्फोटाचा मोठा कट उधळला; ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
राजधानी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसीसच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत दोन संशयितांना अटक केली आहे. यातील एक दिल्लीचा, तर दुसरा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून आपत्तीजनक सामग्री जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण घेतले होते. दिल्लीतील सादिक नगर आणि भोपाळमध्ये यासंबंधित एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दिल्लीतील अदनान आणि भोपाळमधील एका संशयिताला अटक केली.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून दिल्लीत मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. त्यांच्या ताब्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. इसीसचे नेटवर्क आणि त्यांच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
An ISIS module has been busted. Two suspected terrorists arrested. One of the two suspected terrorists is a resident of Delhi. The other is from Madhya Pradesh. Delhi’s heavy footfall areas were on target: Delhi Police Special Cell
— ANI (@ANI) October 24, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List