गर्भपातासाठी तरुणीची याचिका, हायकोर्टाने दिले वैद्यकीय तपासणीचे आदेश
24 वर्षीय तरुणीने गर्भपातासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याची दखल घेत न्यायालयाने या तरुणीच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश दिले आहेत.
बाळाची काळजी घेण्यासाठी मी शारीरिकदृष्टय़ा सक्षम नाही. या गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी या तरुणीने याचिकेत केली आहे. न्या. अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
ही तरुणी 24 आठवडय़ांची गरोदर आहे. तिची तातडीने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. सर जे.जे. रुग्णालयाने यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम तयार करावी. या टीमने तरुणीची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल 28 ऑक्टोबरला सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. यावरील पुढील सुनावणी 29 ऑक्टोबरला होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List