मेटाने एआय टीममधून 600 कर्मचाऱ्यांना काढले
मेटा कंपनीने पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने सुपर इंटेलिजन्स लॅब्स एआय युनिटमधून 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात मेटाची फेसबुक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स रिसर्च टीम, एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीडीबी लॅब यासारख्या युनिटमधून करण्यात आली आहे. या कर्मचारी कपातीवर मेटाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एका रिपोर्टनुसार, मेटाने आपल्या सुपर इंटेलिजेन्स लॅब्समधून जवळपास 600 कर्मचाऱ्यांना कामावरून डच्चू दिला आहे. हे सर्व कर्मचारी एआय मॉडल्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर काम करत होते. मेटाने जून 2025 मध्ये आपल्या एआय टीमला मजबूत करण्यासाठी ऍपल, ओपनएआय आणि गुगल यांसारख्या कंपन्यांमधून अनेक मोठमोठय़ा टेक एक्सपर्टला भरती केले होते. त्यावेळी कंपनीने अब्जो डॉलर खर्च करून एआय डेटा सेंटर्स आणि सुपर इंटेलिजन्स प्रोजेक्ट तयार केले होते. परंतु, आता मेटाने अचानक एआय युनिटमधून कर्मचारी कपात करायला सुरुवात केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List