अमृतसर-पूर्णिया जनसेवा एक्सप्रेसमध्ये भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

अमृतसर-पूर्णिया जनसेवा एक्सप्रेसमध्ये भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

अमृतसर-पूर्णिया जनसेवा एक्सप्रेसमध्ये भीषण आगीची घटना समोर आली आहे. सोनवर्षा कचरी स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. एक्सप्रेसच्या एका कोचला आग लागल्याने रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. आगीची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. आग विझवल्यानंतर, ट्रेन सुरक्षितपणे सहरसा स्थानकावर आणण्यात आली.

अमृतसरहून सहरलाला जात असतानाच ही घटना घडली. आगीत एक्सप्रेसचा एक डबा जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच, रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेनंतर जनसेवा एक्सप्रेसच्या सर्व डब्यांची तपासणी केली जात आहे. आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ? केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ?
हाय युरिक एसिड म्हणजे हायपरयूरिसीमिया आता केवळ सांधेदुखीची समस्या न रहाता किडनी आणि मेटाबॉलिझमला देखील प्रभावित करत आहे. शरीरात युरिक...
प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली, 14 जणांचा मृत्यू
अमृतसर-पूर्णिया जनसेवा एक्सप्रेसमध्ये भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
पोलीस असल्याचे सांगत घरात शिरले, सात जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगणारी, गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या; हर्षवर्धन सपकाळ
त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा
Jammu Kashmir – राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा बोलबाला, तीन जागांवर विजय; भाजपला एक जागा