अमेरिकेचे रशियावर निर्बंध, चीननेही घेतला मोठा निर्णय; जागतिक बाजारात अस्थिरता वाढणार?

अमेरिकेचे रशियावर निर्बंध, चीननेही घेतला मोठा निर्णय; जागतिक बाजारात अस्थिरता वाढणार?

अमेरिकेने रशियावर कठोर कारावाई करत निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या या कारवाईचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता चीनने रशियाच्या तेलाबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चिनी रिफायनरीजनी समुद्री मार्गाने रशियन तेल आयात थांबवली आहे. अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर नवीन निर्बंध लादले असतानाच चीनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत मोठे चढउतार दिसून येऊ शकतात. तसेच जागतिक बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अनेक व्यापारी सूत्रांनी सांगितले की चिनी कंपन्यांनी सुमी मार्गाने रशियन कच्च्या तेलाची आयात थांबवली आहे. सूत्रांनी सांगितले की निर्बंधांच्या चिंतेमुळे, चीनच्या राष्ट्रीय तेल कंपन्या पेट्रोचायना, सिनोपेक, सीएनओओसी आणि झेनहुआ ​​ऑइल किमान अल्पावधीत तरी समुद्रमार्गे रशियन तेलाचा व्यापार करण्यापासून परावृत्त होतील. सध्या, चीन दररोज समुद्रमार्गे अंदाजे १.४ दशलक्ष बॅरल रशियन तेल आयात करतो, यापैकी बहुतेक खाजगी कंपन्या खरेदी करतात.

व्यापाऱ्यांनी सांगितले की रोझनेफ्ट आणि लुकोइल त्यांचे बहुतेक तेल खरेदीदारांशी थेट व्यवहार करण्याऐवजी मध्यस्थांमार्फत चीनला विकतात. अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले की स्वतंत्र रिफायनरी निर्बंधांच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी खरेदी थांबवू शकतात. परंतु तरीही ते रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याचा विचार करतील. चीन पाइपलाइनद्वारे अंदाजे 900,000 बॅरल प्रतिदिन रशियन तेल आयात करतो, ज्यावर निर्बंधांचा फारसा परिणाम होणार नाही असे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेने दोन प्रमुख रशियन कंपन्यांवर नवीन निर्बंध लादल्यामुळे भारतीय कंपन्या रशियन तेल खरेदीतही कपात करतील. रॉयटर्सचे म्हणणे आहे की, हिंदुस्थानी कंपन्यांनी जड शुल्क टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तथापि, रशियन तेलाबाबत सरकारने अद्याप कोणतेही विधान जारी केलेले नाही. रशियाच्या दोन सर्वात मोठ्या ग्राहकांकडून तेलाच्या मागणीत तीव्र घट झाल्यामुळे मॉस्कोच्या तेल महसुलावर दबाव येईल आणि जगातील आघाडीच्या आयातदारांना पर्यायी पुरवठा शोधण्यास भाग पाडले जाईल, ज्यामुळे जागतिक किमती वाढतील. तज्ञांचा असा विश्वास आहे की हिंदुस्थान आणि चीन इतर पुरवठादारांकडे वळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मध्य पूर्व, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील तेलाच्या किमती वाढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या ‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या
जागतिक स्तरावर संसर्गजन्य रोगांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. काही आजार फार जीवघेणा नसतात, परंतु यामुळे आजीवन अपंगत्वासारख्या समस्यांचा धोका...
गर्भवती होण्यासाठी योग्य वय काय? जाणून घ्या
Mumbai News – आधी ब्रेकअप मग पॅचअपचा प्रयत्न, भेटायला बोलावून प्रेयसीवर हल्ला करत प्रियकराने जीवन संपवलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडे यांची मागणी
अफगाणिस्तानला दुहेरी झटका, झिम्बाब्वेने केलं धोबीपछाड आणि ICC ने सर्व संघाला ठोठावला दंड; तब्बल 12 वर्षांनी…
Ahilyanangar news – आई ‘वाघिण’ बनली अन् बिबट्याशी झुंज देत 5 वर्षांच्या मुलाची सुटका केली, शिंगणापूरमधील थरार
अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप