Mehul Goswami – शासकीय सेवेत असतानाही दुसरी नोकरी करणे भोवलं; कर्मचाऱ्याला अटक, 15 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता
शासकीय सेवेत असतानाही दोन नोकऱ्या करणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या 39 वर्षीय तरुणाला अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली आहे. मेहुल गोस्वामी असे या तरुणाचे नाव आहे. दोन दोन नोकऱ्या करत सरकारची फसवणूक करणे आणि सरकारला 50 हजार डॉलर्स (44 लाख रुपये) चा चुना लावण्याचा आरोप त्याच्यावर आरोप आहे.
मेहुल न्यूयॉर्क स्टेट ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेससाठी काम करत होता. शासकीय सेवेत असतानाही तो माल्टा शहरामध्ये दुसरी पूर्णवेळ नोकरी करत होता. याच प्रकरणी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याला 15 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List