जास्त जंक फूड खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ 5 आजार, वेळीच काळजी घ्या अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप

जास्त जंक फूड खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ 5 आजार, वेळीच काळजी घ्या अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप

बदलत्या काळानुसार खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलेल्या आहेत. कारण आजकाल प्रत्येकाला जंक फूड खाण्याचे वेड लागले आहे. तर आपल्यापैकी अनेकजण हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक वेळा जंक फूडचे सेवन करत असतात. जंक फूड चवीला चविष्ट असतात, पण त्यात आरोग्यासाठी हानिकारक अशा अनेक गोष्टी असल्याने आपल्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते जंक फूडचे जास्त सेवन केल्याने शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते आणि यामुळे व्यक्ती अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते. कारण तुम्ही खात असलेल्या या जंक फूडमध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि खूप कमी पोषक घटक असतात. त्यात भरपूर फॅट, साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स असतात, जे आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. जर तुम्ही वेळीच या पदार्थांपासून दूर राहिला नाही तर तुम्ही अनेक असाध्य आजारांना बळी पडाल.

आहारतज्ज्ञांच्या मते जंक फूडमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होते आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढतो.

निरोगी हृदयासाठी फळे, भाज्या आणि फायबरयुक्त आहार आवश्यक आहे. जंक फूडमुळे शरीरात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, जे रक्तवाहिन्यामध्ये जमा होते आणि ब्लॉकेज निर्माण करते. यामुळे रक्तप्रवाहात व्यत्यय येतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. म्हणून, जंक फूड टाळावे किंवा कमी प्रमाणात सेवन करावे.

जंक फूडमध्ये साखर आणि कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. जंक फूडचे वारंवार सेवन केल्याने इन्सुलिन प्रतिसाद बिघडतो आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

वजन वाढणे हे देखील या आजाराचे एक प्रमुख कारण आहे. प्रक्रिया केलेल्या आणि जंक फूडमध्ये मीठ जास्त असते, ज्यामुळे किडनीवर दबाव येतो आणि किडनीचे कार्य कमी होते. जंक फूडमध्ये कॅलरीज भरपूर असतात परंतु पोषण कमी असते, ज्यामुळे शरीरात जास्त फॅट जमा होते, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा हे हृदय, फुफ्फुसे आणि हाडांसह अनेक अवयवांवर प्रतिकूल परिणाम करते.

जंक फूडमधील साखर आणि मीठ तोंडात बॅक्टेरियांना प्रोत्साहन देते, ज्यामुळे दात खराब होऊ लागतात आणि पोकळी आणि इतर दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय जंक फूडचे अधिक सेवन केल्याने नैराश्य आणि ताण वाढण्यास कारणीभूत ठरतात. यासर्व गोष्टींचा मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो आणि मूड स्विंग होऊ लागतात. यासोबतच जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेवर मुरुमे आणि इतर त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे
आरोग्याची वेळीच काळजी न घेतल्यास त्याचे भविष्यात फार गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे काही पदार्थ खातानाही विचार करायला हवा. असे...
रात्री झोपण्यापूर्वी ही एक गोष्ट करा, तुमचा सर्व थकवा नाहीसा होईल, झोपही लागेल शांत
राज्यपालांचा खाजगी एलिफंटा दौरा; उद्या गेटवे-मांडवा, गेटवे -एलिफंटा दरम्यान सागरी वाहतूक बंद
शिवरायांच्या वेशातील तरुणाला विरोध, वसई भुईकोट किल्ल्यावर जाण्यापासून परप्रांतीय सुरक्षारक्षकांनी रोखलं
मुंबईतल्या मदनपुरा भागात इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती
लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद, तरुणीने व्हिडीओ शेअर करून सांगितला घटनाक्रम