केव्हा काय खावे ? रामदेव बाबांनी दिला आहारबाबतचा आयुर्वेदीक सल्ला
नेहमी जेवण योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाण्याचा सल्ला दिला जात असतो. यामुळे न केवळ आपल्या शरीराला एनर्जी मिळतेच तर आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ देखील चांगली रहाते. नेहमीच सकस आणि हलका आहार घ्यायला हवा. परंतू तो योग्य प्रकारे सेवन करणेही खूपच आवश्यक असते. जेव्हा आपण योग्य कॉम्बिनेशनवर जेवण खाऊ लागलो तर यामुळे डायझेशन चांगले होते. आणि शरीरात सगळे पोषक घटक शोषले जातात. परंतू आपण चवीसाठी कोणत्याही वेळेत काहीही खातो चुकीचे कॉम्बिनेशन घेतो. आणि त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे गॅस, कब्ज आणि एसिडिटीची समस्या होऊ शकते.
योगगुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी त्यांच्या युट्युबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.त्यात त्यांनी आहाराबाबत माहिती दिली आहे.त्यांनी सांगितले की व्यक्तीला ऋतभुक, हितभुक आणि मितभुक व्हायला हवे. आयुर्वेदात वेग-वेगळ्या हवामानात वेग-वेगळा आहार करण्याचे म्हटले आहे. वात, पित्त आणि कफ यानुसार आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार भोजन करावे. बॅलन्स आणि अल्पाहारी असावे.
दूध आणि दहीचे सेवन केव्हा करावे ?
बाबा रामदेव यांच्या व्हिडीओत त्यांनी सांगितले की जेवणानंतर एक तासांनी पाणी प्यावे. सकाळी दही, दुपारी ताक आणि रात्री जेवल्यानंतर एक तासांनी दूध प्यायला हवे. जेवणानंतर लगेच दूध पिऊ नये. दूधासोबत मीठाचा कोणताही पदार्थ नसावा, त्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. रात्रीचे दही आणि ताक घेऊ नये. दही खाल्ल्यानंतर रात्री लोक खीर खातात, परंतू हे योग्य नाही. दूधाचा सोबत आंबट फळे खाऊ नयेत. विरुद्ध आहार म्हणजे जेवणातील चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे त्वचेचे आजार, इम्युनिटी कमजोर होणे आणि वात, पित्त सारखे दोष वाढू शकतो.
टरबूज किंवा कलिंगड दूधासोबत कधीच खाऊ नये. याशिवाय हे खाल्ल्यानंतर लगेच पाणी देखील पिऊ नये.यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.कारण यामुळे शरीरात रिएक्शन होऊ शकते. या लहान बाबींची काळजी घ्यायाला हवी. असे चुकीचा आहार घेतल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र खाऊ नये.परंतू यामुळे जास्त त्रास होत नाही. जास्तीत जास्त आहार कच्चा आणि मोड आलेला असावा. जे अंकुरीत आहार घेतात त्यांच्या शरीरात टॉक्सिन्स होत नाहीत. रोज सकाळी मोड आलेले कडधान्य खावीत. जर जमत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी हे खावे. पहिल्यादा सलाड आणि फळे खावीत आणि त्यानंतर भोजन करावे,शेवटी गोड पदार्थ खीर किंवा हलवा खाऊ शकता. हलका आहार आधी, नंतर मध्यम आणि जड आहार शेवटी घ्यावा.
हिरव्या पाले भाज्या आणि आंवळा उकडून खाऊ नये. कारण विटामिन्स सी आणि अनेक पोषक घटक उकडल्याने निघून जातात. सलाड आणि मोड आलेले कडधान्य न उकडता खावीत. शिजलेला कमी बल्की, कच्चाहार फलाहार आणि रसाहार अधिक खायला हवा. कारण हा सात्विक आहार असतो.

आहार केव्हा कसा करावा ? ( Credit : Getty Images )
सलाड कसा खावा ?
सलाड, काकडी, टोमॅटो आणि अनेक प्रकारचे सलाड असतात. लोक यांना ड्रेसिंग करुन खातात. त्यात ऑलिव्ह ऑईल टाकतात. आपल्या देशात यासाठी राईचे तेल योग्य आहे. याने सलाडमध्ये वापरले जाणारे काकडी, टोमॅटो, कांदे आणि इतर भाज्याची पोषक तत्वे वाढतात. केवळ सलाड खाल्ल्याने पचायला कठीण जाऊ शकते. पण तुम्ही ऑलिव्ह ऑईलच्या जागी राईच्या तेल वा त्याची चटणी बनवून खाऊ शकता. राईच्या तेलाची चटई खूपच चांगली असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List