फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोजी यांची पाच वर्षांसाठी तुरुंगात रवानगी, काय आहे प्रकरण?
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी मंगळवारी पॅरिसच्या ला सांते तुरुंगात दाखल करण्यात आले. येथे ते पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगणार आहेत. फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला तुरुंगवास भोगावा लागला आहे. २००७ च्या राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान लिबियातून बेकायदेशीर निधी स्वीकारल्याबद्दल न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली, ज्यामध्ये दोन वर्षांची सक्तमजुरीचा समावेश आहे.
सार्कोझी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी लिबियाचे तत्कालीन शासक कर्नल मुअम्मर गद्दाफी यांच्या सरकारकडून ५० मिलियन युरो (सुमारे ४५० कोटी रुपये) स्वीकारल्याचा आरोप होता. हे पैसे गुप्तपणे मिळवले होते आणि राजकीय प्रभाव पाडण्यासाठी वापरले होते, हा त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List