ग्लासात बॉम्ब फोडणे जीवावर बेतले, स्फोटानंतर शरीरात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणाचा मृत्यू
स्टिलच्या ग्लासात बॉम्ब ठेवून फोडणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. बॉम्ब फुटल्यानंतर ग्लासाचे तुकडे शरीरात घुसल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
नोएडातील छिजेरसी कॉलनीमध्ये दिवाळीनिमित्त तरुण फटाके फोडत होता. तरुणाच्या स्टीलच्या ग्लासात बॉम्ब ठेवून पेटवला. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर ग्लासाचे तुकडे झाले आणि तरुणाच्या शरीरात घुसले. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. असे धोकादायक प्रयोग करण्यापासून दूर राहण्याचे आणि उत्सव सुरक्षितपणे साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List