दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली

दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली

सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचे वातावरण असतानाच सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली. दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलं आहे, असं स्विस प्रदूषण नियंत्रण संस्था आयक्यूएअरनं म्हटलं आहे. अहवालानुसार, मंगळवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली, जी जगातील सर्वाधिक आहे.

स्विस प्रदूषण नियंत्रण संस्था आयक्युएअरच्या (IQAir) अहवालानुसार, मंगळवारी दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४४२ पर्यंत पोहोचला. हा आकडा जगातील इतर प्रमुख शहरांपेक्षा सर्वाधिक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) शहराच्या हवा गुणवत्तेला ‘अत्यंत खराब’ (very poor) श्रेणीत टाकले असून, AQI ३५० असल्याचे नमूद केले आहे. हे प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;