अंडर-23 विश्व कुस्ती स्पर्धेत हिंदुस्थानचा ग्रीको-रोमन गट पहिल्याच दिवशी नामोहरम!

अंडर-23 विश्व कुस्ती स्पर्धेत हिंदुस्थानचा ग्रीको-रोमन गट पहिल्याच दिवशी नामोहरम!

अंडर-23 विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या ग्रीको-रोमन गटाने निराशाजनक कामगिरी केली. चारही गटातील कुस्तीपटू एकही सामना जिंकू शकले नाहीत आणि सर्वांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. 63 किलो गटात गौरव, 77 किलो गटात अंकित, 87 किलो गटात रोहित बुरा आणि 130 किलो गटात जोगिंदर राठी  हे चारही कुस्तीपटू प्रतिस्पर्ध्यांसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. गौरवचा सामना किर्गिस्तानच्या कुट्टूबेक ए. अब्दुराजाकोवशी झाला आणि तो तांत्रिक श्रेष्ठतेमुळे हरला. अंकितलाही सर्बियाच्या जालान पेककडून अशाच पद्धतीने पराभव पत्करावा लागला. क्वॉलिफिकेशन फेरीत रोहितला अमेरिकेच्या पेटन जे. जैकबसनकडून पराभवाचा धक्का बसला, तर जोगिंदरला उजबेकिस्तानच्या दामिरखोन रख्मातोवने सहज हरवले. पहिल्याच दिवशी झालेल्या या पराभवांनी हिंदुस्थानच्या ग्रीको-रोमन पथकाची मोहीम अडखळली असून पुढील फेऱ्यांत पुनरागमन करणे हेच आता संघापुढचे मोठे आव्हान ठरणार आहेग्रीको-रोमन पथकाची मोहिम अडखळली असून पुढील फेऱ्यांत पुनरागमन करणे हेच आता संघापुढचे मोठे आव्हान ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

275 कोटींच्या निधीची खैरात, निवडणुकीच्या तोंडावर मुंबईसह कल्याण-डोंबिवली पुणे, नागपूर पालिकांवर 275 कोटींच्या निधीची खैरात, निवडणुकीच्या तोंडावर मुंबईसह कल्याण-डोंबिवली पुणे, नागपूर पालिकांवर
महानगरपालिकांपासून नगर परिषदांच्या निवडणुकांची चाहूल लागताच महायुती सरकारने मुंबई महानगर पालिकेसह राज्यातल्या विविध महानगर पालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी...
लक्ष्मी प्रसन्न! शेअर बाजारात मुहूर्ताच्या ट्रेडिंगचा उत्साह
‘लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12 हजार भावांनी 13 महिने घेतले प्रत्येकी दीड हजार
8 हजार कोटींचा धूर निघाला! यंदा फटाक्यांची विक्री आणि प्रदूषण वाढले
एच-1 बी व्हिसाच्या नूतनीकरणाला वाढीव शुल्क लागणार नाही, ट्रम्प यांचा दिलासा
मुंबईत कोकणचो दशावतार, दिवाळीच्या मुहूर्तावर खेळ सुरू
आयटीआयमध्ये पौरोहित्याचे धडे! अंमलबजावणीआधीच निर्णय वादात पुरोहित संघटनांकडून विरोध