बिहार निवडणुकीत अंधश्रद्धेचा काळाबाजार, तांत्रिक विधींसाठी खरेदी केले जात आहेत घुबड-मुंगूस
बिहार विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत अंधश्रद्धेचा बाजार जोरात सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. तांत्रिक विधींसाठी घुबड आणि मुंगूस यांची अवैधरित्या विक्री सुरु आहे. दिवाळीत अमावस्या रात्री तांत्रिक विधींसाठी हे प्राणी विकले जात असल्याचं ‘दैनिक भास्कर’च्या तपासणीत समोर आलं आहे. ‘दैनिक भास्कर’ने याप्रकरणी स्टिंग ऑपरेशन केलं, ज्यातून धक्कदायक माहिती समोर अली आहे.
स्टिंग ऑपरेशनमध्ये दैनिक भास्करच्या प्रतिनिधींनी घुबड आणि मुंगूस यांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या तस्करांशी फोनवरून संवाद साधताना. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय नेते या प्राण्यांचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती तस्करांनी दैनिक भास्करच्या प्रतिनिधींना दिली. वन्यजीव संरक्षण कायद्याखाली बंदी असलेल्या या प्राण्यांचा व्यापार पाटणा शहरात सुरु आहे.
स्टिंग ऑपरेशनमध्ये दैनिक भास्करच्या प्रतिनिधींनी गुप्तपणे तस्करांशी संपर्क साधला. यावेळी मजर नावाच्या एका तस्कराने सांगितलं की, “तीन घुबड राजकीय नेत्यांना विकले. त्यांनी ते निवडणुकीसाठीच घेतले. घुबडांच्या पायांच्या बोटांच्या संख्येनुसार त्यांची ‘शक्ती’ ठरते. १० बोटांचा घुबड २८०० रुपयांत मिळतो, तर २५ बोटांचा हिल स्टेशनचा दुर्मीळ घुबड २५ लाख रुपयांत. २५ बोटांच्या घुबडची काळी जादू कधीच अपयशी ठरत नाही,” असा दावा तस्करने केला. तसेच मुंगूस कुबेरांचे वाहन म्हणून २००० रुपयांत विकला जातो, ज्याने श्रीमंती आणि यश मिळते, असा विश्वास आहे, हेही तस्कराने दैनिक भास्करच्या प्रतिनिधींना सांगितलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List