पाकिस्तानचं दिवाळ! महागाईने गाठला उच्चांक, टोमॅटोचे दर ऐकून बसेल धक्का
पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. पाकिस्तानमध्ये सामान्यांच्या जेवणाच्या ताटातून टॉमेटो गायब झाला आहे. टोमॅटोचे दर थेट 100 रुपये किलोवरून थेट 700रुपये प्रति किलो दरावर पोहोचले आहेत.
पाकिस्तानात आलेल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यात अफगाणिस्तानसोबतच्या तणावामुळे त्यांच्यासोबतचा व्यापार थांबला आहे. स्थानिक शेतीतील टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त झाले आहे तर अफगाणिस्तानने टोमॅटो सहीत इतर भाज्यांची निर्यात थांबवली आहे. त्यामुळे पाकिस्तानात टोमॅटो सहित इतर भाज्यांच्याही किंमतीत वाढ झाली आहे.
पाकिस्तानात भीकाऱ्यांची संख्या वाढली
पाकिस्तानात भीक मागणे हा महत्त्वाचा धंदा बनला आहे. पाकिस्तानच्या 23 कोटी जनतेतील 4 कोटी लोकं ही भिकारी आहेत. म्हणजेच पाकिस्तानातील प्रत्येक सहावी व्यक्ती भिकारी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List