‘लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12 हजार भावांनी 13 महिने घेतले प्रत्येकी दीड हजार

‘लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12 हजार भावांनी 13 महिने घेतले प्रत्येकी दीड हजार

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या योजनेत तब्बल 12 हजार 431 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकी दीड हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.

माहितीच्या अधिकारातून ही पोलखोल झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. त्यात या 12 हजार भावांनीही लाभ घेतल्याचे समोर आले. महिला व बालविकास विभागातील अधिकाऱयांनीही याला दुजोरा दिला. ही नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला अशा 77 हजार 980 महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले. त्यांना 12 महिन्यांपर्यंत ही रक्कम मिळाली. या बोगस पुरुष लाभार्थींच्या खात्यात 25 कोटी तर अपात्र महिलांच्या खात्यात सरकारचे 140 कोटी गेले.

  • आता 26 लाख लाभार्थी अपात्र.
  • लाखो संशयित खाती योजनेच्या यादीतून वगळण्यात आली.
  • पुरुष लाभार्थ्यांनी जुलै 2024 ते जुलै 2025 या काळात लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले. त्यानंतर पैसे थांबवले गेले, पण वसुली केली गेली नाही.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक होते किंवा एका कुटुंबात दोन किंवा त्याहून अधिक सदस्यांनी योजनेचा लाभ घेतला अशा 77 हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;