Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक

Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक

>>दुर्गेश आखाडे

नाट्यक्षेत्रात कारकिर्द घडविण्यासाठी पूर्वी कोकणातील कलाकार मुंबईत जात आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करत होते. कोकणातील कलाकार “पारावरची” नाटकं करत होता पण हा शिक्का पुसून काढत कोकणातील कलाकारांनी थेट मुंबईच्या रंगभूमीवर धडक मारली आहे. कोकणच्या लालमातीतील कलाकारांना घेऊन कोकणातूनच व्यावसायिक दर्जाच्या नाटकाची निर्मिती करून त्या नाटकाचे मुंबईत प्रयोग करण्याचे धाडस रत्नागिरीतील ग्रामीण भागातील कलाकारांनी केले आहे. ‘रंग भरू दे रे आमुच्या गणा’ या नाटकाचा उद्या २२ ऑक्टोबर रोजा दीनानाथ नाट्यगृहात प्रयोग होत आहे. कोकणातील कलाकारासाठी मुंबईतील रंगभूमीचे दरवाजे उघडले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानदानाचे काम करणारे प्राथमिक शिक्षक राजेश गोसावी यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. राजेश गोसावी यांनी उत्सवात पारावरचे नाट्यप्रयोग करत असताना आपल्याही नाटकाचा प्रयोग तिकिटं लावून मुंबईतील रंगभूमीवर झाला पाहिजे, हे स्वप्न पाहिले. रंग भरू दे आमुच्या गणा या नाटकाचे सहजसुंदर लेखन करताना दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले. या नाट्यप्रयोगाने काही महिन्यातच ३९ प्रयोगांचा टप्पा पार करताना मुंबई मराठी रंगभूमीवर झेप घेतली आहे. दि.२२ ऑक्टोबर रोजी रात्री सवा आठ वाजता दीनानाथ नाट्यगृहात त्यांचा प्रयोग होणार आहे. समीर घारे, पंढरीनाथ मायशेट्ये, गौतम कांबळे आणि संतोष म्हेत्रे यांचे या नाटकाला पाठबळ मिळाले आहे. या नाटकात राजेश गोसावी, नंदू जुवेकर, ऐश्वर्या बापट, श्रावणी करंबेळे, दीपक माणगावकर, राहुल तोडकरी, सचिन काष्टे, संदेश पवार, सागर काष्टे, आदित्य खाडे, सुजित मोहित, आकाश चौघुले, सागर चौघुले, वैष्णवी बोंबले, वेंदाती बोंबले आणि सृष्टी बोंबले यांच्या भूमिका आहेत तर श्रीकांत बोंबले यांनी गायनातून नाटकात रंग भरला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘शारीरिक संबंध’ शब्दावरुन बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ‘शारीरिक संबंध’ शब्दावरुन बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी केवळ ‘शारीरिक संबंध’ शब्दाचा वापर पुरेसे नाही. ‘शारीरिक संबंध’ शब्दाबरोबरच सहाय्यक पुरावे असल्याशिवाय...
क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले
ग्लासात बॉम्ब फोडणे जीवावर बेतले, स्फोटानंतर शरीरात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणाचा मृत्यू
दिल्ली-आग्रा मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प
बिहार निवडणुकीत अंधश्रद्धेचा काळाबाजार, तांत्रिक विधींसाठी खरेदी केले जात आहेत घुबड-मुंगूस
Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोजी यांची पाच वर्षांसाठी तुरुंगात रवानगी, काय आहे प्रकरण?