8 हजार कोटींचा धूर निघाला! यंदा फटाक्यांची विक्री आणि प्रदूषण वाढले

8 हजार कोटींचा धूर निघाला! यंदा फटाक्यांची विक्री आणि प्रदूषण वाढले

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदा फटाक्यांची विक्रमी विक्री झाली. दिवाळीच्या चार दिवसांत मुंबईकरांनी तब्बल आठ हजार कोटी रुपयांचे फटाके पह्डले. मंदीचे सावट असतानाही दिवाळीत फटाके फोडण्याचा उत्साह गगनाला भिडला आणि प्रदूषण अत्यंत घातक पातळीवर पोहोचले. मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुमारे चार हजार कोटींहून अधिक रुपयांचे फटाके फुटले. त्यामुळे सायंकाळी सर्वत्र फटाक्यांचा धूर होऊन नागरिकांची घुसमट झाली.

चिराबाजार येथील फटाक्यांच्या घाऊक विव्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, वसुबारस, धनत्रयोदशी, अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजन या चार दिवसांत तब्बल आठ हजार कोटी रुपयांहून अधिक फटाक्यांची विक्री झाली आहे. चिराबाजार येथील फटाका मार्पेटमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, अलिबाग आदी परिसरांतून हजारो नागरिक फटाक्यांची खरेदी करण्यासाठी हजेरी लावतात. मंगळवारी संपूर्ण दिवसभर चिराबाजार येथील प्रसिद्ध इसाभाई फायर वर्क या दुकानासह परिसरातील सर्वच घाऊक फटाके विव्रेत्यांकडे फटाके खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. आणखी दोन दिवस फटाके खरेदीसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे, असे चिराबाजार येथील इसाभाई फायर वर्क दुकानातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

विषारी फटाके रोखण्यात सरकार अपयशी

फटाक्यांमधून विषारी जड धातू बाहेर पडत आहे. या वर्षी दिवाळीपर्यंत अधूनमधून पाऊस पडल्यामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. प्रदूषणकारी फटाके आणि हवेची गुणवत्ता याबाबत वर्षानुवर्षे चाचण्या आणि मोहिमा राबवूनही सरकार विषारी फटाके रोखण्यात अपयशी ठरल्याचा दावा ‘आवाज फाऊंडेशन’ने केला.

पहाटे 4 पर्यंत ‘धडामधूम’

न्यायालयाचे आदेश असूनही यंदा सरकारचा प्रदूषणकारी फटाके फोडण्यावर कुठलाही कंट्रोल राहिला नाही. मंगळवारी पहाटे 4 पर्यंत मुंबईत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यामुळे वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये बंडाळी; कलंकित, भ्रष्टाचारी माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये बंडाळी; कलंकित, भ्रष्टाचारी माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध
सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपमध्ये बंडाळी माजली असून, भाजप पदाधिकाऱ्यांनीच शहर कार्यालयासमोर कलंकित, भ्रष्टाचारी माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला थेट आव्हान देत...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
275 कोटींच्या निधीची खैरात, निवडणुकीच्या तोंडावर मुंबईसह कल्याण-डोंबिवली पुणे, नागपूर पालिकांवर
लक्ष्मी प्रसन्न! शेअर बाजारात मुहूर्ताच्या ट्रेडिंगचा उत्साह
‘लाडकी बहीण’ योजनेत 164 कोटींचा घोटाळा, 12 हजार भावांनी 13 महिने घेतले प्रत्येकी दीड हजार
8 हजार कोटींचा धूर निघाला! यंदा फटाक्यांची विक्री आणि प्रदूषण वाढले
एच-1 बी व्हिसाच्या नूतनीकरणाला वाढीव शुल्क लागणार नाही, ट्रम्प यांचा दिलासा