Pandharpur News – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज

Pandharpur News – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज

वसुबारसपासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. आज लक्ष्मीपूजननिमित्त पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम हिऱ्याचा, मोत्याचा तुरा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, शिरपेच लहान, शिरपेच १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तुळशीची माळ ३ पदरी, मोहन माळ ५ पदरी, हायकोल, सूर्यकाळ्यांचा हार, तांदळ्या हार ७ पदरी, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, पदकासह लॉकेट, तुळशीची माळ १ पदरी, लक्ष्मी पदक लॉकेट, तोडे जोड, झनक झनक हार, सोन्याचे पैंजण जोड, नवरत्नाचा हार, सोन्याचे पितांबर इ. अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, जडावाचा तानवड जोड, चंद्र, सूर्य, खड्यांची वेणी, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचा तुरा, खड्याची बिंदी, मण्यां मोत्याच्या पाटल्या जोड, बाजीराव गरसोळी, चिंचपेटी हिरवी, जडावाचे बाजूबंद जोड, नवरत्नाचा हार, तन्मणी मोठा, शिंदे हार ३ पदरी, ठुशी, वाक्या जोड, रूळ जोड, पैंजण जोड, मस्त्य जोड, सोन्याचा करंडा, मासपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

श्री.राधिका मातेस सिध्देश्वर टोप, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, जवेची माळ, चिंचपेटी तांबडी व श्री.सत्यभामा मातेस लक्ष्मी टोप, हायकोल, जवमानी पदक, जवेची माळ, पुतळ्यांची माळ अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील सुवर्णालंकाराची लक्ष्मीपूजन म्हणून प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. तर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची दिवाळी निमित्त सुवर्ण अलंकाराची पूजा बांधण्यात आली.

मंदिर व नामदेव पायरी इत्यादि ठिकाणी दिवाळीच्या लक्ष्मीपूजना निमित्त विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर मंदिराची केलेली आकर्षक सजावट मनमोहक दिसून येत असून, या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेलं तसेच दिवाळीच्या आनंद पर्वानिमित्त मोठ्या संख्येने विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले
क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सात नागरिकांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच...
ग्लासात बॉम्ब फोडणे जीवावर बेतले, स्फोटानंतर शरीरात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणाचा मृत्यू
दिल्ली-आग्रा मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प
बिहार निवडणुकीत अंधश्रद्धेचा काळाबाजार, तांत्रिक विधींसाठी खरेदी केले जात आहेत घुबड-मुंगूस
Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोजी यांची पाच वर्षांसाठी तुरुंगात रवानगी, काय आहे प्रकरण?
दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली