Ratnagiri News – फटाक्यांच्या ऐवजी ढगांचा गडगडाट, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच वीजपुरवठा खंडीत

Ratnagiri News – फटाक्यांच्या ऐवजी ढगांचा गडगडाट, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच वीजपुरवठा खंडीत

फटाक्यांच्या आतषबाजी ऐवजी ढगांचा गडगडाट झाला आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वीजपुरवठा खंडित झाल्याने एकच गोंधळ उडाला. परतीच्या पावसाने आज पुन्हा दाणादाण उडवली. दिवसभर कडाक्याच्या उन्हामुळे रत्नागिरीकर हैराण असतानाच आज सायंकाळी सवा सहा वाजता ढगांचा गडगडाट आणि वीजांचा चमचमाट करत पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू होताच महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला. सक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावरच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. रात्री उशिरा पर्यंत पाऊस पडत होता.

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे.सरासरी सवातीन हजार मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदा मे महिन्यात पडलेल्या पावसाने जसा दणका दिला होता तसाच परतीचा पाऊस ही शेतकऱ्यांना दणका देऊन जात आहे. आज सायंकाळी आलेल्या पावसामुळे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बाजारपेठत आलेल्या मंडळींची त्रेधातिरपीट उडाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;