व्हॉट्सअॅप युजर्सला झटका, चॅटजीपीटी आता वापरता येणार नाही
व्हॉट्सअॅप युजर्स आता थर्ड-पार्टी एआय चॅटबॉट्स वापरू शकणार नाहीत. मेटाने नवी घोषणा केली आहे की, व्हॉट्सअॅपवर फक्त मेटा एआय असिस्टंटच वापरता येईल आणि इतर सर्व थर्ड-पार्टी एआय चॅटबॉट्सवर बंदी घातली जाईल. या निर्णयामुळे ‘ओपनएआय’ आणि ‘परप्लेक्स्टी’सारख्या कपन्यांना मोठा झटका बसणार आहे.
नव्या निर्णयानुसार, युजर्स आता फक्त व्हॉट्सअॅपवर मेटाचा एआय चॅटबॉट वापरू शकतील. मेटाचा हा निर्णय पुढच्या वर्षी 15 जानेवारी रोजी लागू होईल. याचा अर्थ असा की, 15 जानेवारीनंतर चॅटजीपीटी आणि परप्लेक्सिटी एआयसारखे चॅटबॉट्स व्हॉट्सअॅपवर ऑपरेट करू शकणार नाहीत. मेटाने या बदलासाठी व्हॉट्सअॅप बिझनेस एपीआयची पॉलिसीदेखील अपडेट केली आहे. अपडेट केलेल्या पॉलिसीत असे म्हटले आहे की, जर एखादी कंपनी चॅटबॉट्सला त्यांची मेन सर्व्हिस म्हणून ऑफर करत असेल तर त्या कंपनीवर हे निर्बंध लागू होतील.
मेटाचे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅपवर अनेक एआय चॅटबॉट्सचा वापर त्याची इन्फ्रास्ट्रक्चर कपॅसिटी आणि टेक्निकल सपोर्ट सिस्टमवर अतिरिक्त दबाव टाकत आहे. त्याचबरोबर डेटाची सुरक्षा आणि पॉलिसी नियमांचीही मेटाला चिंता आहे. त्यामुळे मेटाचे म्हणणे आहे की, ती आता व्हॉट्सअॅपला आपल्या एआय इकोसिस्टमपर्यंत मर्यादित ठेवणार आहे.
मेटा व्हॉट्सअॅपवर आणखी एक मोठा बदल करणार आहे. रिप्लाय न देणाऱ्या लोकांना पाठवल्या जाणाऱ्या मेसेजवर मंथली लिमिट घालू शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List