शिंकताना आपले हृदय खरंच काही सेकंदांसाठी थांबते? म्हणून लोक घेतात देवाचे नाव,सत्य काय?

शिंकताना आपले हृदय खरंच काही सेकंदांसाठी थांबते? म्हणून लोक घेतात देवाचे नाव,सत्य काय?

अनेकदा सर्दीशिवाय देखील धुळीमुळे किंवा कोणत्यातरी वासामुळे शिंक येते. शिंक येण्याआधी आपल्याला तसे संकेत मिळतात. म्हणजे नाकात विचित्र गुदगुल्या जाणवतात. किंवा काहीतरी हालचाल जावते सिग्नलनंतर मेंदूपर्यंत पोहोचतो आणि शिंक येते. पण तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का की. शिंक येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीर थरथरते. तसेच डोक आतून हालल्यासारखं वाटतं. तसेच त्या शिंकेची कळ कुठेतरी हृदयापर्यंत नक्कीच पोहोचते. म्हणून त्यावेळी असंही जाणवतं की, हृदयाने तेवढा सेकंद ब्रेक घेतला की काय?

शिंकताना तेवढ्या सेकंदापुरते हृदयाचे ठोके थांबतात

असं खरंच म्हटलं जातं की शिंक येणे ही एक सामान्य घटना असली तरी, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की शिंकताना तेवढ्या सेकंदापुरते हृदयाचे ठोके थांबतात. खरंच असं होतं का? चला जाणून घेऊयात की हे मिथक आहे की सत्य?

हे जाणून आश्चर्य वाटेल

शिंकताना हृदय थांबते असे अनेकदा म्हटले जाते. परंतु हे जाणून आश्चर्य वाटेल की यात काहीही तथ्य नाही. हे खरे आहे की शिंकताना हृदय थांबत नाही. पण जेव्हा तुम्हाला शिंकण्यापूर्वी श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा असे वाटते की तुमचा श्वास मंदावला आहे आणि तुमचे हृदय थांबले आहे की काय. त्यामुळे लगेच लोक देवाचे नाव घेतात.

शिंक आल्यावर नक्की काय घडते?

शिंकण्यापूर्वी तुम्ही श्वास घेता तेव्हा तुमच्या छातीवर थोडा दाब पडतो आणि शिंकताना जोराने श्वास सोडला जातो. तेव्हा छातीवरील तो दाब थोडा कमी होतो. या दाबामुळे रक्तप्रवाहात बदल होतात. तसेच कधीकधी जोरात शिंकल्याने छातीत हलकी चमकही येते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडतात की काय असं वाटतं. पण तसे होत नाही.

हृदयाचे ठोके थोड्या-बहुत प्रकारे प्रभावित होऊ शकतात पण…

हा हृदयाचे ठोके थोड्या-बहुत प्रकारे प्रभावित होऊ शकतात. पण शिंकताना हृदय धडधडणे थांबते हे पूर्णपणे खरे नाही. शिंकताना हृदयातील क्रिया अखंडपणे सुरूच असते.

( महत्त्वाची टीप:  पण काहीवेळेला शिंकताना झालेला त्रास काही वेगळा आहे, किंवा जास्तच छातीत दुखतंय असं जर जाणवलं तर त्याकडे दुर्लक्ष न करता. डॉक्टरांशी संपर्क नक्की करा. )

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केसनंद गावाच्या यादीत  एका घरात 188 नावे!  फटाके फोडून मतदार यादीची केली होळी केसनंद गावाच्या यादीत एका घरात 188 नावे! फटाके फोडून मतदार यादीची केली होळी
पुणे जिह्यातील केसनंद गावामध्ये निवडणूक आयोगाच्या यादीनुसार एका घरामध्ये एकाच जाती-धर्माचे तब्बल 188 लोक राहतात, त्यांचे यादीत नाव आहे. परंतु...
अतिवृष्टी भरपाईपोटी 150 कोटींची मदत लालफितीत; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत नाहीच
राधानगरी तालुक्यात ट्रक-दुचाकी अपघात; बहीण-भावासह चिमुकलीचा मृत्यू
साताऱ्यात आठ महिन्यांपासून ग्रामरोजगार सहाय्यक राबताहेत मानधनाविना
Photo – गोंडस… लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर रणवीर दीपीकाने दाखवला लाडक्या लेकीचा फोटो
बोनस कमी दिल्याने कर्मचाऱ्यांनी टोल उठवला! कंपनीला शिकवला धडा, 35 लाख रुपये बुडाले
चहावाल्याकडे सापडली 1 कोटींची रोकड