उत्तम आरोग्यासाठी ओवा का खायला हवा, वाचा

उत्तम आरोग्यासाठी ओवा का खायला हवा, वाचा

आपल्यापैकी अनेकांना अन्न लवकर पचत नाही. अशावेळी घरच्या घरी काही छोटे पण महत्त्वाचे उपाय हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. अन्नपचन होण्यासाठी खूप वेळ लागतो, अशावेळी आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच खासकरुन पावसाळ्याच्या सीझनमध्ये ओवा खाण्याचे खूप फायदे आहेत. आपल्या मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अन्नाची चव वाढवण्यासोबतच, ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये आढळणारे पोषक घटक तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात. अनेक प्रकारचे आजार टाळण्यासाठी हे मसाले अनेक घरगुती उपचारांमध्ये देखील वापरले जातात.

सुंदर चेहऱ्यासाठी हे घरगुती उपाय आहेत सर्वात बेस्ट

ओवा खाण्याचे फायदे

ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म देखील आढळतात. म्हणून ओव्याच्या सेवनाने आजार आणि संसर्गापासून वाचण्यास देखील मदत होते.

जेवणानंतर ओवा खाल्ल्याने गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

रात्रीच्या जेवणानंतर ओवा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ओवा नुसता खाणं आवडत नसल्यास, ओव्याचे गरम पाणी करुन पिऊ शकता.

कलिंगड खाण्याचे अगणित फायदे, जाणून घ्या

दातदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात ओवा आणि मीठ यांचे मिश्रण खूप प्रभावी आहे.

ओव्यामध्ये एक आवश्यक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असते, म्हणजे थायमॉल. यामुळे त्वचेच्या संसर्गापासून आराम मिळतो.

ओवा रात्री झोपण्याआधी खाल्ल्याने, बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहण्यास मदत होते. शिवाय ओवा पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास देखील किमयागार आहे.

पावसाळ्यातील थंडाव्यामुळे होणारी सर्दी टाळण्यासाठी तुम्ही रात्री ओवा खायला हवा. ओव्याचे सेवन केल्याने शरीर आतून उबदार राहण्यास मदत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;