आपल्या आरोग्यासाठी ही पीठे आहेत वरदान, वाचा

आपल्या आरोग्यासाठी ही पीठे आहेत वरदान, वाचा

परिपूर्ण आणि सकस आहार हा निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जिभेला ज्या गोष्टी चांगल्या त्या शरीरासाठी हानिकारक असतात. हे वाक्य आपण खूपदा ऐकले आहे. परंतु हे वाक्य आपल्या मनावर मात्र ठसलेले नाही. आपण अनेकदा जे जिभेला चांगले तेच खाण्याकडे आपला कल असतो. परंतु जिभेला उत्तम लागणाऱ्या गोष्टी सकस आणि पौष्टिक असतीलच असे नाही. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करायलाच हवा. आपल्याकडे घरामध्ये गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवल्या जातात. परंतु तंदुरुस्त राहण्यासाठी, गव्हाऐवजी इतर पिठांचा वापर करायला हवा. अशाच काही पिठांबद्दल आणि त्यांच्या गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया.

त्वचेला उजळपणा येण्यासाठी ‘या’ तेलाचा वापर करुन बघा, वाचा

बेसन: बेसनामध्ये भरपूर प्रथिने असतात, म्हणून बेसनाची भाकरी खाल्ल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात. हे शरीराला शक्ती देते आणि पोट बराच काळ भरलेले ठेवण्यास मदत करते. बेसन खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाची जळजळही कमी होते.

कलिंगड खाण्याचे अगणित फायदे, जाणून घ्या

जवाचे पीठ: गव्हाऐवजी जवाच्या पिठाची भाकरी खाऊ शकता. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते थंडावा देणारे धान्य आहे, म्हणूनच ते फायदेशीर मानले जाते.

हरभरा, नाचणी आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांचे सेवन केल्याने आपले पोट तर भरतेच, शिवाय आरोग्यही चांगले राहते आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला जडपणा जाणवणार  नाही. परंतु यापैकी कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल तर, कोणत्याही आजारावर उपचार घेत असाल तर काहीही नवीन सुरू करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नाचणीचे पीठ: नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असून , ते हाडांसाठी फायदेशीर असते. नाचणी शरीराला थंडावा देते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया निरोगी ठेवते आणि साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करते.

सुंदर चेहऱ्यासाठी हे घरगुती उपाय आहेत सर्वात बेस्ट

ज्वारीचे पीठ: ज्वारीची भाकरी सर्वोत्तम मानली जाते कारण ती शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते. यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात, जे शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत करतात. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते, मनसेचा संताप दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते, मनसेचा संताप
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून गेल्या 13 वर्षापासून दर दिवाळीला दीपोत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज...
पॅरिसमध्ये धुमस्टाईल चोरी, 800 कोटींचे दागिने घेऊन चोर फरार
कोस्टल रोडवर BMW कारला अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
आपल्या आहारात उडदाची डाळ समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
चिरा बाजार येथील म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला, दोन ज्येष्ठ नागरिक जखमी
कच्ची कैरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
बलुचिस्तान, PoK घेण्याची भाषा करणाऱ्यांकडे आपलाच चषक परत आणण्याची कुवत नाही – संजय राऊत