लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नेत्रदीपक फुलांची सजावट

लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नेत्रदीपक फुलांची सजावट

दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत वैभव, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त अर्जुन हनुमान पिंगळे (रा. बीड) यांच्या मार्फत ही सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी सुमारे 1500 ते 2000 किलो इतक्या प्रमाणात विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत. या फुलांमध्ये कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनीयम, जिप्स, सायकस, गुलछडी, इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तीभावाने उजळून निघाला आहे.

मंदिरातील श्री.विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वार, या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले आहे. पारंपारिक आणि आधुनिक फुलांच्या रचना यांचा सुंदर संगम भाविकांना एक अद्भुत दृश्यानुभूती देत आहे. या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा अत्यंत कुशलतेने केलेला वापर, रंगसंगतीतील समतोल, तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या आध्यात्मिकतेला साजेसा सुगंधित वातावरणनिर्मिती झाली आहे.अशी माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने भाविकांसाठी दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
— श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘नटरंग’ नंतर रवी जाधव यांचा तमाशापट ‘फुलवरा’ ‘नटरंग’ नंतर रवी जाधव यांचा तमाशापट ‘फुलवरा’
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 साली आलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या...
जालन्यातील परतूरात फटाक्यांवरून झालेल्या वादातून तरुणांवर तलवारीने हल्ला; दोन जण गंभीर जखमी
दिवाळी बोनस कमी दिला, टोल कर्मचाऱ्यांनी हजारो वाहनांना टोल न देता जाऊ दिले; 30 लाखांचे नुकसान
सोलापुरात दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला कार्यकर्त्यांचाच विरोध; भाजप कार्यालयासमोरच आंदोलन
निवडणूक आयोगाच्या कानाचे पडदे फाटले आहेत का? संजय राऊत यांचा संतप्त सवाल
तुमच्या शहरात कोणत्या रुग्णालयात मिळतात मोफत उपचार, पण कसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नेत्रदीपक फुलांची सजावट