सोलापुरात दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला कार्यकर्त्यांचाच विरोध; भाजप कार्यालयासमोरच आंदोलन
सोलापुरात दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध असल्याचे दिसून येत आहे. मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यासाठी अनेक कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोरच आंदोलनाला बसले आहेत. सोलापुरात सोमवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात काळी दिवाळी साजरी केली होती. मात्र, लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयासमोर काळया टोप्या घालून आंदोलन केले.
हे भाजपचे सर्व कार्यकर्ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यांनी थेट माजी आमदार दिलीप माने यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाला विरोध केल्याचे दिसून येत आहे. दिलीप माने यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजप प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. कार्यकर्त्यांच्या बैठकीत माने यांनी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. मंगळवारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सिव्हिल हॉस्पिटल पाठीमागील कार्यालयासमोर काळया टोपी आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करत भ्रष्टाचारी व कलंकित नेत्यांच्या प्रवेशाला तीव्र शब्दात विरोध दर्शवला.
भाजपमध्ये प्रवेशाला विरोध नाही, पक्ष वाढला पाहिजे, कार्यकर्ते वाढले पाहिजे. मात्र, पक्षात ज्यांना प्रवेश करायचा आहे, त्यांच्या चारित्र्य पाहिले पाहिजे. त्यांच्यावरील आरोप तपासले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. आता य सोलापूरात भाजप कार्यकर्तेच पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करत असल्याचे दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List