कमळाबाई हातोहात गंडवतेय; मिंधे गटाची घालमेल वाढली, पहिल्या यादीत ठाणे, कल्याण, पालघर आणि नाशिक लटकले

कमळाबाई हातोहात गंडवतेय; मिंधे गटाची घालमेल वाढली, पहिल्या यादीत ठाणे, कल्याण, पालघर आणि नाशिक लटकले

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये कमळाबाई मिंधे गटाला हातोहात गंडवत असल्याचे दिसून आले आहे. मिंधे गटाने आज आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात ठाणे, कल्याण, पालघर आणि नाशिक मतदारसंघांचा समावेश नाही. हे मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी भाजपने मिंधे गटावर वेगवेगळय़ा मार्गाने दबाव आणला आहे. तो आजच्या पहिल्या यादीत दिसून आला असून पहिल्या यादीत नाव न आल्याने या मतदारसंघांतील मिंधे गटाच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

ज्या ठिकाणी आपले विद्यमान खासदार आहेत ते मतदारसंघ आपल्या वाटय़ाला यावेत असा मिंधे गटाचा आग्रह आहे. परंतु त्यातील काही आपल्याकडे घेण्याचा भाजपचा जोरकस प्रयत्न सुरू आहे. ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक या मतदारसंघांवर तर भाजपचा डोळाच आहे. येनकेन प्रकारेण तिथे धुसफूस निर्माण करून ते मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.

मिंधे गटाने दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रताप जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगलेतून धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे.

इथले उमेदवार का लटकले

ठाणे

एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. मात्र ती जागा आपल्या वाटय़ाला यावी यासाठी भाजपा आग्रही आहे.

कल्याण

कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. आपल्या मुलाला तिथे दुसऱयांदा संधी देण्यास एकनाथ शिंदे इच्छुक आहेत, परंतु पहिल्या यादीत कल्याणचे नाव नाही. कारण आता कल्याण आम्हाला द्या, ठाणे तुम्ही घ्या असा प्रस्ताव भाजपने दिल्याचे कळते.

नाशिक

नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे मिंधे गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या नावाला भाजपाने विरोध केला आहे. मात्र गोडसे त्या जागेवर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरही शक्तिप्रदर्शन केले होते. दुसरीकडे नाशिकच्या जागेवर अजित पवार गटानेही दावा केला असून साताऱयाच्या बदल्यात नाशिक हवेच अशी त्यांची मागणी आहे. त्या जागेवर छगन भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उभे करण्याच्या अजित पवार गटाच्या हालचालीही सुरू आहेत.

पालघर

पालघरमध्ये राजेंद्र गावीत हे विद्यमान खासदार मिंधे गटात आहेत. भाजपने गावीत यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचे सांगत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. पालघरमध्ये दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास भाजपा आग्रही आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्नासाठी तयार जान्हवी कपूर? दोन शब्दात दिलं उत्तर माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्नासाठी तयार जान्हवी कपूर? दोन शब्दात दिलं उत्तर
अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार...
Lok Sabha Election 2024 : मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी
पश्चिम बंगाल सरकारला दिलासा, शिक्षक भरती रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती
धाराशीवमध्ये तानाजी सावंतांच्या गुंडांचा धुडगूस, मतदान केंद्राजवळ शिवसैनिकाची भोसकून हत्या
Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्याला हिंसेचे गालबोट, खून, दमदाटी, हाणामारी, ईव्हीएमही पेटवले; 5 मृत्यू
100 कोटींचा घोटाळा दोन वर्षांत 1100 कोटींचा कसा झाला? ईडीला सुप्रीम कोर्टाचे तडाखे
मोदींचा बुरशी धरलेला माल जनता 4 जूनला केराच्या टोपलीत फेकणार, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले