कोल्हापूर जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित मतदान केंद्र ठरतंय लक्षवेधी, मतदानाचा टक्का वाढणार

कोल्हापूर जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित मतदान केंद्र ठरतंय लक्षवेधी, मतदानाचा टक्का वाढणार

जिल्हाधिकारी अमोल येडगे व जि.प.चे मुख्य कार्य.अधिकारी कार्तिकेयन एस.यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित 71 मतदान केंद्रे जिल्ह्यात तयार करण्यात आली आहेत.कागल तालुक्यात बानगे येथे “कुस्ती पंढरी”,लिंगनूर येथे “कोल्हापुरी कापशी चामडी चप्पल ” तसेच हुपरी येथे “चांदीची हुपरी कला गुणांची पंढरी” या विषयावर मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. पर्यावरण पूरक तसेच गावातील वैशिष्ट्यांसह लक्षवेधी ठरणारी मतदान केंद्र तसेच उन्हाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आरोग्यासह केलेली व्यवस्था पाहता,मतदानाची टक्केवारी यंदा वाढण्याची शक्यता अधिक चांगली आहे.

कागल तालुक्यातील लिंगनुर येथे कापशी चामडी चप्पल बनवण्याची पद्धत त्याच्या वापराचे फायदे याबाबत माहिती फलक लावण्यात आले आहेत. तसेच येथील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलांचे प्रदर्शन लवण्यात आले आहे.बानगे मध्ये कुस्तीच्या आखाड्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून कुस्तीसाठी लागणारे साहित्यही दाखवण्यात आले आहे.तसेच कुस्ती आखाडा, कुस्ती साहित्य व कुस्तीचे पारंपरिक साहित्य याविषयी थोडक्यात माहिती देणारे आकर्षक फलक पद्धतीने लावण्यात आले आहेत.हुपरी येथे चांदीपासून तयार करण्यात आलेल्या दागिन्यांचे व वस्तूंचे आकर्षक फलक लावण्यात आले आहेत.यासह जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आदर्श मतदान केंद्रे व जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.या मतदान केंद्रांना आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी भेट देऊन केंद्रांची पाहणी केली.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;