… ही चिडचिड खूप काही सांगून जाते, मतदार कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही! रोहित पवारांचा हल्लाबोल

… ही चिडचिड खूप काही सांगून जाते, मतदार कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही! रोहित पवारांचा हल्लाबोल

देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत असल्याने या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत असल्यामुळे हा मतदारसंघ महत्वाचा मानला जात आहे. आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर पैसे वाटल्याचा आरोप केला. तसेच एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे की, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;