रत्नागिरी-सिंधुदुर्गात 1 वाजेपर्यंत 33.91 टक्के मतदान; कडक उन्हाचा मतदानावर परिणाम

रत्नागिरी-सिंधुदुर्गात 1 वाजेपर्यंत 33.91 टक्के मतदान; कडक उन्हाचा मतदानावर परिणाम

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 1 वाजेपर्यंत या मतदारसंघात 33.91 टक्के मतदान झाले. उन्हाचा कडाका वाढल्याने अनेकांनी सकाळीच मतदान केले. वाढत्या उन्हामुळे दुपारी मतदारांची संख्या कमी झाली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 51 हजार 630 मतदार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 21.29 टक्क्यांवर पोहचली. दुपारी 1 वाजेपर्यंत 33.91 टक्के मतदान झाले. त्यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात 37.09 टक्के,रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 28 टक्के,राजापूर विधानसभा मतदारसंघात 37.05 टक्के,कणकवली विधानसभा मतदारसंघात 31.59 टक्के,कुडाळ विधानसभा मतदारसंघात 32.88 टक्के,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 36.65 टक्के मतदान झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत…. रोहित शर्माने स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत…. रोहित शर्माने स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले
अनेकदा खेळाडूंचे प्रॅक्टिंस दरम्यान किंवा मॅचदरम्यान बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी रोहीत शर्मा याने चक्क एका...
अफगाणिस्तानात पावसाचा हाहाकार, मदतीसाठी सैन्य तैनात; दिवसभरात 60 तर दोन आठवड्यात 370 जण दगावले
… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा
पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा
Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत