बद्धकोष्ठता दूर करुन आतड्यांची सफाई करतील हे ४ जालीम उपाय, आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला काय ?

बद्धकोष्ठता दूर करुन आतड्यांची सफाई करतील हे ४ जालीम उपाय, आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला काय ?

बदलेली लाईफस्टाईल आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांची सकाळ वाईट जाते. पोट साफ झाल्यासारखे वाटत नाही. आणि दिवसभर आळस आल्या सारखे जडजड वाटत राहाते. तणाव, झोप पुरेशी न मिळणे आणि व्यायाम न केल्याने आतड्याच्या हालचाली कमी होतात. तसेच काही औषधांचा दुष्परिणामामुळे देखील बद्धकोष्ठतेचा ( Constipation ) त्रास होता. त्यामुळे पोटात गॅस, जडपणा, अपचन आणि शरीरात टॉक्सिक पदार्थ जमल्याने आपल्याला त्रास होत रहातो. यासाठी आयुर्वेदात उपाय आहे.

आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या मते जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर केवळ चार उपायांनी त्यावर आराम मिळतो. या चार उपायांनी पतच चांगले होते आणि आरोग्य देखील चांगले रहाते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते मणुक्याचे पाणी, त्रिफळा, तूप आणि स्निग्ध पदार्थांच्या आहारात समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठता रोखण्यासाठी फायबर यु्क्त आहार, पुरेसे पाणी पिणे, हलका व्यायाम आणि नियमित दिनचर्या गरजेची आहे. चला तर हे चार उपाय काय ते पाहूयात…

गरम पाण्यात तूप आणि मिठी साखरेचा वापर

जर बद्धकोष्ठता दूर करायची आहे तर सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा तूप आणि एक चमचा खडी साखरचे सेवन करावे. गरम पाणी शरीराला हलके गरम ठेवतो आणि आतड्यांची हालचाल वाढवतो.तूप आतड्यांना वंगनाचे काम(Lubricate) करते. त्यामुळे मल सहजपणे बाहेर पडतो.पाणी आणि तूपाचे मिश्रण मलाला नरम बनवते आणि बद्धकोष्ठता कमी करते. खडी साखर हलका गोडपणा आणि थंडावा देते. ज्यामुळे पोटाला आराम मिळतो आणि पचन यंत्रणा संतुलित रहाते. रोज सकाळी रिकाम्या पोटी खडीसाखर आणि तूपाचे सेवन केल्याने पोट साफ रहाते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

मणुक्याचे पाणी पिणे

रात्रीच्या वेळी एक ग्लास पाण्यात 15-20 काळे मणुके भिजत ठेवावे आणि सकाळी त्याचे पाणी प्यावे आणि मणुके चाऊन खावेत. मणुक्यात फायबर असते.जे आतड्यात पाणी साठवून ठेवते, त्यामुळे मल नरम होतो.हे पाणी प्यायल्याने मल सहजपणे बाहेर निघतो आणि बद्धकोष्ठता कमी होते. हे पाणी पोटाच्या स्नायूंना सक्रीय करते.आतड्यांची गती वाढवते. मणुक्यांना पाण्यात भिजवल्याने हे अतिरिक्त पाणी आतड्यात पोहचते, त्यामुळे मल सॉफ्ट रहाते. मणुका एक हलका नैसर्गिक उपाय आहे. ज्यामुळे कोणत्याही साईड इफेक्शशिवाय बद्धकोष्ठतेचा उपचार होतो. यास रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने पोट नेहमी स्वच्छ रहाते.

ज्येष्ठमध आणि हरडा चूर्णाचे सेवन

बद्धकोष्ठतेने त्रस्त असाल तर जेवण्याच्या अर्धातास आधी अर्धा चमचा ज्येष्ठमधाचे चूर्ण आणि पाव चमचा हरडा चूर्ण यांचे सेवन करावे. ज्येष्ठमध आणि हरडा दोन्ही पचनाच्या एंजाईमना सक्रीय करतात. याने भोजन लवकर पचते आणि पोट हलके रहाते. हरड्याचे हलके फ्लेवोनॉयड आणि मुलेडीचे ल्युकोरिजिन मलास नरम करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. हे मिश्रण आतड्यातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय रोज या दोन्ही हर्बचे सेवन केले जाऊ शकते.

जेवणात स्निग्ध पदार्थाचा वापर

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी जेवणा स्निग्ध पदार्थांचा वापर करावा , त्यामुळे जेवणाचे पचन सहज होते. तूप,तेल, दूध आणि अन्य स्निग्ध पदार्था पोट आणि आतड्यांना वंगन लावण्याचे काम करतात. त्यामुळे मल सहजपणे बाहेर पडतो आणि बद्धकोष्ठता दूर होते. तेल युक्त पदार्थांने आतड्याची गती सक्रीय होते. पोट हलके होते आणि पचन सुरळीत होते आणि आरोग्य चांगले होते. तुम्ही डाएटमध्ये तूप, नारळाचे तेल, तिळाचे तेल, दूध आणि शेंगदाण्याची पेस्टचे सेवन करु शकता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
हात धुणे एक आवश्यक सवय आहे, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला वाचता येते. आपण जेवणापूर्वी किंवा टॉयलेटवरुन आल्यानंतर कोणाला स्पर्श केल्यानंतर...
डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक
अमेरिकेला लढायचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत लढू, १०० टक्के टॅरिफ लादल्यानंतर चीनचा इशारा
जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या, जिल्हा प्रशासनाच्या मेरीटाईम बोर्ड आणि प्रदूषण मंडळाला सूचना